अकोट : अकोट शहरातील प्रतिक हेमंत साळुंके याने यूजीसी नेट परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण देशात एस.टी. (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. मराठी विषयात मिळवलेले हे यश अकोट तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये प्रतिक साळुंके याने उत्कृष्ट कामगिरी करत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच आचार्य (पीएच.डी) अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे. त्याच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात त्याचे उज्ज्वल भविष्य निश्चित मानले जात आहे.
प्रतिक साळुंके हा अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा एम.ए. मराठी विषयातील माजी विद्यार्थी आहे. अभ्यासातील सातत्य, नियोजनबद्ध तयारी आणि मार्गदर्शन वर्गांचा लाभ यामुळे त्याला हे यश मिळाले. त्याने बी.एड शिक्षण पूर्ण केले असून पीएच.डी.साठी आवश्यक असलेली पीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सध्या त्याचे पीएच.डी. संशोधन कार्य सुरू असून कोर्सवर्क परीक्षेतही त्याने चांगले गुण मिळवले आहेत.
Related News
अकोट जिल्हा परिषद शाळेत घाणीचे साम्राज्य ,आवार भिंत पडली विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर धोका
धक्कादायक! उमरा गावात चवताळलेल्या माकडाचा हैदोस; 10 दिवसांत 3 जण जखमी
ऑपरेशन प्रहार : अकोटजवळ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
हिदायत पटेल हत्याकांडात मोठी घडामोड; अकोट सत्र न्यायालयाकडून ४ फरार आरोपींविरुद्ध अटक वॉरंट
अकोटमध्ये करंट लागून म्हशीचा मृत्यू, धारूर गावातील दुर्दैवी घटना; शेतकऱ्याला मदतीची मागणी
१० वैशिष्ट्यांसह श्री संत वासुदेव महाराज पालखीचे भव्य प्रस्थान; हरिनामाच्या गजरात आकोटकरांचा अविस्मरणीय आनंदोत्सव
“भीषण उन्हात अकोट-कुटासा बस बंद! प्रवाशांचे 5 धक्कादायक हाल, एसटी प्रशासनावर संतापाचा भडका”
युरिया खरेदीसाठी आता सातबारा अनिवार्य; अकोटमध्ये रांगा ओसरल्या
7 तास उन्हात ताटकळत उभे शेतकरी! सावरा येथे युरिया खतासाठी भीषण रांगा, बळीराजाचा संताप अनावर
धक्कादायक! अकोट आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य; 15 लाखांच्या ठेक्यानंतरही व्यापाऱ्यांचा संताप
सावरगाव ग्रामसभेत 10 गंभीर मुद्द्यांवर प्रचंड संताप; अपंग निधी, घरकुल आणि 15 व्या वित्त आयोगावर धक्कादायक प्रश्न
त्याच्या यशामागे प्राचार्य डॉ. सुनील पांडे, प्राचार्य डॉ. विलास तायडे, डॉ. अशोक इंगळे, डॉ. भास्कर पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्याला यशाच्या शिखरावर पोहोचता आले.
प्रतिक साळुंकेच्या या यशाबद्दल अकोट तालुक्यात सर्वत्र त्याचे अभिनंदन होत असून विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. त्याच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
