अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धारूर गावात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी नवघन हरी सबाळ यांच्या म्हशीचा इलेक्ट्रिक पोलच्या तानाला (स्टे वायर) करंट लागल्याने जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सदर प्रकरणात नेमका करंट कसा आला आणि निष्काळजीपणा झाला का, याची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.
(टीप: ही प्राथमिक माहिती असून अधिकृत पंचनामा व संबंधित विभागाच्या अहवालानंतर तपशील स्पष्ट होईल.)
Related News
read also : https://ajinkyabharat.com/fifa-marathi-post-2026-8-awesome-marathi-post-with-ronaldo-messi-viral-worldwide/
