अकोला :
अकोला महानगरपालिकेत आज महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ता कायम राखत महत्त्वाचा विजय मिळवला आहे. महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची, तर उपमहापौरपदी भाजपचे अमोल गोगे यांची निवड झाली.
या निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांना एकूण ४५ मते मिळाली, तर विरोधकांकडे ३२ मते होती. दरम्यान एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिल्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले.
मतदानाचा आकडा
Related News
अकोला शिक्षक बदली घोटाळ्यावर प्रशासनाचा मोठा प्रहार! 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली; 136 दोषींवर कठोर कारवाई
अकोला : अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील बहुचर्चित आंतर...
Continue reading
मोठा धक्का! अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; शहराच्या राजकारणात मोठी खळबळ
जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचा आदेश; तिन्ही न...
Continue reading
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या संघटन विस्ताराला चालना देण्यासाठी टॉवर चौक येथील पक्ष कार्यालयात ऑफलाईन सभासद नोंदणी अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. अभियानाच्या पहिल्याच दिवश...
Continue reading
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे कामकाज सुरू असताना नगरसेविका पती गजानन कांबळे यांनी थेट सभागृहात प्रवेश करून सभापती विजय अग्रवाल यांच्याशी वाद घातल्याने मोठा ...
Continue reading
अकोला महानगरपालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी टनावर आधारित नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०० वाहनांचा ताफा, खासगी कंत्राटदार, संगणकीकृत वजनकाटा आणि पारदर्शक निविदा प्...
Continue reading
धक्कादायक! तोतया CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश; १२ तासांत २५ लाखांची लूट उघड, दोन आरोपी अटकेत
अकोला : अकोला जिल्ह्यात तोतया केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) अधिकारी बनून व्यापाऱ्याची २५ ल...
Continue reading
अकोला-पातूर महामार्गावरील शिरला गावाजवळ कोंबड्यांनी भरलेल्या मालवाहू पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. अकोल्याहून पातूरच्या दिशेने जात असताना वाहनाचा अचानक टायर फुटल्य...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपरिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. बार्शीटाकळी नगरपरिषदेतील काँग्रेस, राष्ट...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पातूर तालुक्यातील...
Continue reading
अकोला : अकोला शहरातील नवीन तारफैल परिसरात भरदिवसा घडलेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर 24 वर्षीय अंकुश नंदागवळी ...
Continue reading
अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) उपचारासाठी आलेल्या एका आदिवासी महिलेने आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालय परिसरात फिरत असल्याचा व्हिडि...
Continue reading
अकोला शहरातील गीता नगर परिसरातील एका ओपन स्पेसमध्ये असलेल्या झाडांना अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने तसेच धुराचे ल...
Continue reading
सत्ताधारी आघाडी (४५ मते):
भाजप – ३८
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – ३
शिवसेना (शिंदे गट) – १
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – १
अपक्ष (आशिष पवित्रकर) – १
एकूण – ४५
विरोधी बाक (३२ मते):
काँग्रेस – २१
वंचित बहुजन आघाडी – ५
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ६
एकूण – ३२
सभागृहात गोंधळ
एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिल्याने काँग्रेस व एमआयएम नगरसेवकांमध्ये वाद झाला. एमआयएमच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. याचदरम्यान काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी सभागृहात बांगड्या फेकल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले.
या सर्व घडामोडींमुळे अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/pak-vs-aus-t20-world-cup-east-pakistan-got-tyancha-abhishek-sharma-sam-ayubchi-played-stormy/