अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपरिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. बार्शीटाकळी नगरपरिषदेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच चार अपक्ष अशा एकूण १० नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात या नगरसेवकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये नऊ मुस्लिम नगरसेवकांचा समावेश असल्याने या घडामोडीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू झाली आहे.
या पक्षप्रवेशासाठी अकोला जिल्हा शिवसेनेचे विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे आणि जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी पुढाकार घेतला. नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
Related News
पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार? मुंढवा जमीन प्रकरणात थेट आरोपी करण्याची मागणी
शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान आयोगाच्या भूमिकेवर मोठा प्रश्न
शिंदेंच्या वकिलाचे दोन मोठे युक्तिवाद; शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात कोर्टात काय घडलं?
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; अहमदाबादचा प्रवास रस्तेमार्गे
दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’
Manoj Jarange Patilनी 20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण वाद थांबेना; अजय महाराज बारस्करांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला फडणवीसांचं प्रत्युत्तर; ‘आम्ही करून दाखवलं, पुढेही करून दाखवू’
UPI पेमेंटवर आता शुल्क? 15 ऑक्टोबरपासून काय बदलणार, ग्राहकांवर किती परिणाम होणार?
लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे आक्रमक; 5 हजार कोटींच्या रकमेवर सरकारला थेट सवाल
राष्ट्रवादीचं मेगा प्लॅनिंग! सुनेत्रा पवारांचं होणार ‘रिलाँचिंग’; ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ कॅम्पेनची चर्चा
Disha Salian प्रकरणावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’
या प्रवेशामुळे बार्शीटाकळी नगरपरिषदेतील शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पक्षप्रवेशानंतर बार्शीटाकळीतील राजकारण अधिक चुरशीचे होण्याची चिन्हे असून, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांकडूनही संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
