अकोला-पातूर महामार्गावरील शिरला गावाजवळ कोंबड्यांनी भरलेल्या मालवाहू पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. अकोल्याहून पातूरच्या दिशेने जात असताना वाहनाचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याच्या कडेला उलटली.
या अपघातात वाहनातील शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला असून चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहन चालक आणि त्याचा मदतनीस किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली तसेच अपघातग्रस्त वाहनातील कोंबड्या बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. अपघातामुळे काही काळ अकोला-पातूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
Related News
Weather Update : देशावर पुन्हा पावसाचं संकट; महाराष्ट्रासाठीही IMDचा मोठा इशारा
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे; अमित आझाद यांचे प्रतिपादन
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री भरणे
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे 4 आरोपी अटकेत
‘कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही?’ रोहित पवारांचा सरकारला सवाल
भाग्यश्री यांच्या कुटुंबात वारसाहक्काचा वाद; दत्तक मुलाला संपत्तीत किती अधिकार? कायदा काय सांगतो?
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी; मुखदर्शनाची रांग 10 किलोमीटरपार
मुंबई कोस्टल रोडवर BMW चा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, 1 गंभीर
पेट्रोल पंपावर UPI पेमेंटला ब्रेक? 2 हजारांवरील व्यवहारांवर डीलर्सचा विरोध
अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावूक; भरसभेत डोळ्यांत अश्रू
UPI शुल्कावरून राज ठाकरे संतापले; मोदी सरकारला थेट सवाल, म्हणाले- ‘डिजिटल सापळा’
प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले असून, पुढील तपास सुरू आहे. चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
