अकोला : अकोला शहरातील नवीन तारफैल परिसरात भरदिवसा घडलेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर 24 वर्षीय अंकुश नंदागवळी याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बागडे किराणा दुकानाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश नंदागवळी हा परिसरात असताना तीन ते चार जणांनी त्याला अडवून अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्या मानेवर, डोक्यावर, छातीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की अंकुश गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला.
Related News
कल्याणमध्ये थरारक हत्याकांड! प्रियकराची निर्घृण हत्या, मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये लपवला; आरोपी महिला फरार
ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या मलंग रोड परिसर...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
मोठा धक्का! अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; शहराच्या राजकारणात मोठी खळबळ
जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर आयुक्त डॉ. सुन...
Continue reading
लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा इनोव्हा कारमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्...
Continue reading
पुणे क्राइम: बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत अनेक राजकीय नेत्यांची नावं, गंभीर आरोपांमुळे खळबळ
पुणे: शहरातील गुलटेकडी परि...
Continue reading
स्नॅपचॅटवर जुळलेल्या प्रेमासाठी ओडिशातील १८ वर्षीय तरुणी प्रियकरासोबत महाराष्ट्रात आली. नातेवाईक आणि पोलिस तिच्या शोधात पोहोचले, मात्र १०० रुपयांच्या ...
Continue reading
विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ! गिरिजा राऊत प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्...
Continue reading
वाशिमच्या समृद्धी महामार्गावर पतीने पत्नीची लोखंडी रॉडने मारहाण करून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना. तीन लहान मुलांसमोर घडलेल्या या गुन्ह्यानं...
Continue reading
विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधातील तक्रारीनंतर नवा वाद; सुनेवर 13 बॅगा, सोनं-चांदी आणि पैशांच्या मागणीचे आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाक...
Continue reading
विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबाविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर पीडित सुनेच्या आईची पहिली मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन...
Continue reading
बीड Crime News : आचारी म्हणून काम करून घरी परतणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; क्षुल्लक वादातून चाकूहल्ला, मित्र गंभीर जखमी
बीड : महाराष्...
Continue reading
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर राऊत यांनी पहिल्यांदाच भूमिक...
Continue reading
प्राथमिक तपासात हा खून जुन्या वैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shiv-sena-crisis-9-pack-3-mp-gairhajar-thackeray-gatta-again-mothi-foot-increased-disturbance-due-to-operation-tiger/