Akot Municipal Election 2025 मध्ये जातीय गणित, गटबाजी आणि अंतर्गत राजकारणामुळे उमेदवारांचा प्रचंड वर्षाव झाला. कोणाच्या माथी बसणार नगराध्यक्षपदाची मुद्रा? संपूर्ण 2000 शब्दांची सविस्तर बातमी वाचा.
अकोट नगरपरिषद निवडणूक २०२५ चा बिगुल वाजताच शहरातील राजकारण अक्षरशः पेटले आहे.नगराध्यक्ष पदासाठीची लढत यंदा’प्रेस्टीज बॅटल’ठरणार असून सर्वच प्रमुख पक्षांतून उमेदवारांच्या घोषणा धडाधड झाल्या आहेत.जातीय समीकरणे,स्थानिक गटबाजी आणि पक्षातील अंतर्गत खेळीमुळे उमेदवार निवडीत पक्षश्रेष्ठींची त्रेधातिरपीट उडाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.वंचित बहुजन आघाडीची पहिली झोड
स्वाती चिखले मैदानात सर्वप्रथम जोराचा राजकीय फटका वंचित बहुजन आघाडीकडून बसला.स्वाती मंगेश चिखले यांच्या उमेदवारीने आघाडीने थेट निवडणुकीचा सूरच बदलून टाकला.शहरातील चर्चाना यामुळे टर्बोच स्पीड मिळाला.काँग्रेसची बाजी अलका बोडखे रिंगणात काँग्रेसनेही विलंब न लावता अलका संजय बोडखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत लढाईत आपली जोरदार एन्ट्री घेतली आहे.एआयएमआयएमचा प्रभावी डाव एआयएमआयएमने शरीफ राणा यांच्या पत्नीची उमेदवारी जाहीर करून मुस्लिम बहुल भागात आपला प्रभाव दाखवण्याची चुणूक दाखवली आहे.या उमेदवारीचे राजकीय वजन चांगलेच जाणवते.
Related News
राष्ट्रवादी(अजित पवार गट)ची एंट्री गाजीयाबानो बदरुज्जमा अजित पवार गटाकडून गाजीयाबानो मो.बदरुज्जमा यांची एन्ट्री जाहीर होताच समीकरणे पुन्हा गुंतागुंतीची झाली.पक्षातील गटबाजी शांत करण्यासाठी हा ‘कडक डोस’देण्यात आल्याचे बोलले जात आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्याकडून अध्यक्षपदाकरिता अधिकृत उमेदवार म्हणून विजयाताई मनोहर चौधरी यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे.
भाजपचा मोठा दाव माया धुळे यांची उमेदवारी जाहीर भाजपने माया विवेक धुळे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा श्वास ‘या वेळी भगवा वरच!’ अशा घोषणा सुरू झाल्या.शिंदे गटही मागे नाही चंचल पितांबरवाले मैदानात शिवसेना(शिंदे गट)ने चंचल सुनील पितांबरवाले यांचे नाव जाहीर करून स्वतःचा गड सुदृढ करण्याची तयारी दाखवली आहे.कोणाच्या माथी नगराध्यक्षपदाची मुद्रा ?
‘ अकोटमध्ये चहाच्या टपरीपासून ते बाजारपेठेत एकच चर्चा ‘२०२५ मध्ये नगराध्यक्षपदाची खुर्ची कोण गाठणार?’जातीय समिकरणे, प्रभागनिहाय आकडे, पक्षांतर्गत बंडाळी, तरुण मतदारांचा कल, या सर्वांनी निवडणूक यंदा फक्त राजकीयच नाही तर सामाजिक टक्कर बनली आहे.अकोटचे राजकारण उकळत्या स्थितीत ! आता फक्त उमेदवार नव्हे, तर लोकांचा मूड कोण ओळखतो यावर नगराध्यक्षपदाची ‘मुद्रा’ उमटणार आहे.
