नवी दिल्ली : ‘फौजदारी खटल्यांच्या सुनावणीदरम्यान उलटलेल्या साक्षीदारांची प्रभावी आणि अर्थपूर्ण उलटतपासणी सरकारी वकिलांकडून बिलकुल होताना दिसत नाही,’ असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच सुनावले. ‘न्यायालयांनी केवळ टेपरेकॉर्डरसारखे काम करू नये, सुनावणीमध्ये सहभागाची भूमिका घेणे गरजेचे आहे,’ या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.
‘सत्य प्रस्थापित करणे आणि न्यायाचे उद्दिष्ट साध्य करणे हे न्यायालयांचे कर्तव्य आहे. त्यासाठी न्यायाधीशांनी कार्यवाहीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सरकारी वकील कामात उदासीन किंवा आळशी असेल, तरीही सत्य समोर यावे यासाठी न्यायालयाने कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवले पाहिजे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
पत्नीच्या हत्येप्रकरणी १९९५मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका व्यक्तीच्या शिक्षेवर न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. त्या वेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही निरीक्षणे नोंदवली. या पीठामध्ये न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचाही समावेश होता.
Related News
SIR मोहिमेवरून नवा वाद! सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाची कोंडी? ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवरून नवे प्रश्न उपस्थित
SIR मोहिमेतील फॉर्म-६, ECINet प्रणाली आणि म...
Continue reading
सौरभ दास यांचा न्यायाधीशांवर घणाघात; संविधानाबाबत काय म्हणाले?‘अनेक न्यायाधीशांनी देशाला धोका दिला’; न्यायाधीशांच्या उत्तरदायित्वावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, म...
Continue reading
सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला मोठा इशारा! मतमोजणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सादर करा, अन्यथा प्रतिकूल निष्कर्ष काढणार
निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज आणि व्हिडीओ ...
Continue reading
जंतर-मंतरवर आंदोलनाला मोठा ब्रेक! गृह मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय; 3 नवीन ठिकाणे निश्चित
Jantar Mantar Protest News : दिल्लीतील जंतर-मंतर हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र आता अधिकृत आ...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकार मोठी चूक करतंय, आम्हाला हेच हवंय!”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गां...
Continue reading
शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
विधीमंडळातील संख्याबळाच्या चाचणीवर शिंदे गटाचा भर; ‘विवेकाधिकाराचा...
Continue reading
India-Bangladesh : BRICS परिषदेत गैरहजेरी, आता भारताकडून बांग्लादेशच्या नव्या उच्चायुक्तांच्या नियुक्तीला अद्याप मंजुरी नाही
BRICS : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंधांमध्ये पु...
Continue reading
शिवसेना चिन्ह सुनावणी : शिंदे गटाच्या वकिलांचा भावनिक युक्तिवाद; ‘कार्यकर्ते हेच पक्षाचा प्राण’ म्हणत ठाकरे गटावर निशाणा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्त...
Continue reading
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी : उद्धव ठाकरेंना धक्का देणारा शिंदे गटाचा दावा; ‘पक्षप्रमुख’ पदावरून सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्व...
Continue reading
सीजेपीच्या आंदोलक विद्यार्थ्याला 5 लाखांची नोटीस; सरन्यायाधीश सूर्यकांत संतप्त
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यार्थ्यावर कारवाईचा प्रयत्न? मॅजिस्ट्रेटला उत्तर देण्याचे आदे...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवर शरद पवार म्हणाले, ‘कोर्टाचा निकाल येईल, त्याआधी भाष्य करणं योग्य नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याची शक्यता; साखरेचे दर, पावसाची स...
Continue reading
‘सरकारी वकिलांच्या गंभीर त्रुटी आणि कर्तव्याप्रति निष्काळजी यांचे भान न्यायालयाने ठेवावे, एखाद्या व्यक्तीविरोधातील गुन्हा हा संपूर्ण समाजाच्या विरोधातील गुन्हा आहे. त्यामुळे सरकारी वकील किंवा कनिष्ठ न्यायालयांचे पीठासीन अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे निष्काळजी किंवा कसूर करणे परवडणारे नाही,’ असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.
नियुक्त्यांमध्ये राजकारणाला थारा नको
‘सरकारी वकिलांची सेवा आणि न्यायपालिका यांच्यातील संबंध हा फौजदारी न्याय व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे सरकारी वकील पदावर नियुक्तीसारख्या बाबींमध्ये राजकारणाला थारा मिळू नये,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
पत्नीच्या हत्येप्रकरणी झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अर्जदाराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या जोडप्याची पाच वर्षांची मुलगी हत्येच्या गुन्ह्याची एकमेव साक्षीदार होती. सुनावणीदरम्यान ही अल्पवयीन मुलगी साक्ष देऊ न शकल्याने तिला उलटलेला साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, ‘अर्जदाराने निशस्त्र, असहाय पत्नीवर चाकूने १२ वार केले होते, ही बाब दुर्लक्षित करण्याजोगी नाही,’ असे म्हणून न्यायालयाने शिक्षेविरोधातील अपील फेटाळले.