नवी दिल्ली, ८ मे २०२५ — पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर,
भारताच्या संरक्षण यंत्रणेत हालचालींना वेग आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज
सीडीएस जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलप्रमुखांसोबत अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
या बैठकीत, देशातील सध्याची सुरक्षास्थिती, सीमावर्ती भागांतील हालचाली,
ऑपरेशनल तयारी, आणि संभाव्य धोके यांचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे.
भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल यांच्या सध्याच्या सज्जतेचा ताळेबंद या चर्चेत मांडला जात आहे.
ही बैठक काल झालेल्या पाकिस्तानी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने घेतलेल्या कठोर पावलांनंतर घेतली जात असून,
पुढील रणनिती ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या बैठकीनंतर संरक्षण मंत्री DRDO
(संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) च्या प्रमुखांची भेट घेणार आहेत, जिथे शस्त्रास्त्रांची उपलब्धता,
स्वदेशी उत्पादनांची स्थिती आणि युद्धसज्जतेचा आढावा घेण्यात येणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chandigad-ambalat-hawai/