वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ

वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ

पातूर : तालुक्यातील ग्रामपंचायत बोडखा (चिंचखेड) मध्ये १५ वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करून

भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.राज बोरकर यांनी केला आहे.

ग्रामपंचायत बोडखा (चिंचखेड) येथे १५ वित्तच्या कामात भ्रष्ट्राचार झाला असून वारंवार गटविकास

Related News

अधिकारी पं.सं. पातुर यांच्या कडे केंद्र शासन माहिती अधिकार अध्याशे, २००५ च्या कलम १९ (१) अन्वये अपिली अर्ज नुसार,

सामान्य फंड व १५ वित्त आयोग अंतर्गत झालेल्या कामांची माहिती व हिशोब मागितला असता.

कुठल्याही प्रकारची रीतसर चौकशी तसेच कार्यवाही करण्यात आली नाही.

तसेच गट ग्रामपंचायत बोडखा (चिं) मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना वृक्ष लागवड

स.प.ई क्लास गट क्रमांक ४०/४१ मध्ये झालेला भ्रष्टाचार संबंधित चौकशी व कुठल्याही प्रकारची रीतसर कार्यवाही करण्यात आली नाही.

जाब विचारल्यास टाळा टाळ ची उत्तरे देणे,अरेरावीची भाषा वापरणे अश्या अनेक तक्रारी आहेत.

सदर प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवसेना (शिंदे) अकोला जिल्ह्याच्या

वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख डॉ.राज बोरकर यांनी दिला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-16-year-old-student/

Related News