अकोला शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी अकोल्यात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे हा लज्जास्पद प्रकार ऑटो रिक्षा चालकाकडून घडला असून,
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
त्याने केवळ छेडछाडच नव्हे तर मुलीच्या हाताला आणि दंडाला चावा घेतला, अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
विद्यार्थिनीची धावपळ आणि आरोपीला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्या येथील संबंधित विद्यार्थीनी अकोल्यात भाड्याच्या खोलीत राहून नीट परीक्षेची तयारी करत होती.
काल ती गावाहून परत आल्यानंतर बसस्थानकावरून ऑटोरिक्षातून खोलीकडे जात असताना, रिक्षाचालकाने तिच्याशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी नराधम चालकाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
विरोध करताच त्याने हात आणि दंडाला चावा घेतला. कसाबसा बचाव करत विद्यार्थिनीने पळ काढला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.
आरोपीचे नाव : जाफर खान सुभेदार खान
सदर घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून,
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी जाफर खान सुभेदार खान याला अटक केली.
त्याच्यावर भादंवि कलम 354, 354(A), 354(D), 323 आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Byte : मालती कायटे, ठाणेदार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन
“घटनेची गंभीरता लक्षात घेता तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.
पीडितेला आवश्यक मदत पुरवण्यात येत आहे. अशा प्रकारांबाबत महिलांनी न घाबरता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.”
नागरिकांमध्ये संताप
अशा प्रकारच्या घटनांमुळे अकोल्यातील पालकवर्गात भीतीचे वातावरण आहे.
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, ऑटोरिक्षा चालकांची पडताळणी,
सुरक्षा उपाय आणि महिला विद्यार्थिनींसाठी विशेष पोलीस पथकाची मागणी जोर धरू लागली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-nau-varsharanya-mulacha-inhuman-rakh-aichya-jivalgawarun-jeeva-ghetla/