नवी दिल्ली | ९ मे २०२५ — भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून
चंदीगड आणि अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चंदीगडमधील वेस्टर्न कमांड आणि अंबालामधील एअरफोर्स स्टेशन यामुळे हे ठिकाण महत्त्वाचं मानलं जातं.
Related News
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात, पाकिस्तान सीमेपासून २० किलोमीटर परिसरातील
गाव रिकामे करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
जैसलमेरमध्ये लष्करी तळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेतली जात आहे.
जम्मू-कश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला
असून पाकिस्तानच्या ‘धनधार’ पोस्टवर प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये ११ ठिकाणी ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले.
जम्मू एअरपोर्ट आणि पठाणकोट एअरबेस सुद्धा पाकिस्तानी सुसाइड ड्रोनच्या निशाण्यावर होते.
भारताच्या डिफेन्स सिस्टीमने S-400 आणि आकाश मिसाईल
वापरून बहुतेक हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानचे ५० हून अधिक ड्रोन भारताने पाडले आहेत.
पठाणकोटजवळ एक पाकिस्तानी फायटर जेट पाडल्याची माहिती आहे,
मात्र यास अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
कर्नाटकात भारतीय सैन्याला पाठिंबा दर्शवत तिरंगा यात्रा काढण्यात आली.
विविध राज्यांतील नेत्यांनी भारताच्या लष्कराशी एकजूट दाखवून देशाच्या रक्षणासाठी उभं राहण्याचा संदेश दिला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/lucknow-maharana-pratap-jayantiinimitta-tyachanya-putuyala-pushpanjali/