नवी दिल्ली:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम आता देशाच्या हवाई वाहतुकीवरही जाणवू लागला आहे.
अनेक उड्डाणे विलंबाने होत असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद
या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र काही भागात बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे उड्डाणांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
यामुळे प्रवासाचा मार्गही लांब झाला आहे आणि प्रवासाचा कालावधीही वाढला आहे.
सरकारकडून महत्त्वाची अॅडव्हायजरी
या पार्श्वभूमीवर सरकारने एक अधिकृत अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की:
-
उड्डाणांमध्ये प्रत्याप्त इंधनाचा साठा असणे बंधनकारक आहे.
-
प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची सोय पुरवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांवर असेल.
-
प्रवाशांनी संभाव्य विलंब लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, अंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे उड्डाणांना अधिक वेळ लागू शकतो
आणि काही वेळा प्रवासादरम्यान अन्य ठिकाणी थांबा करावा लागू शकतो.
प्रवाशांसाठी सूचना
प्रवाशांनी प्रवासासाठी थोडा अधिक वेळ राखून ठेवावा, तसेच आवश्यक त्या वैयक्तिक वस्तू, औषधे आणि अन्नपदार्थ सोबत ठेवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharate-pakistan-operation-operation-tayar-motha-judging-paul-uchalnar/