शेंदुर्जन – येथील किंडर गार्डन प्री-स्कूलमध्ये ३० मार्च, रविवार रोजी
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने प्रभात फेरी, सांस्कृतिक सादरीकरण आणि गुढीपाडव्याच्या
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
महत्त्वावर मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
प्रभात फेरीत चिमुकल्यांचा रामायण साजरा
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य जया जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरीने झाली.
सकाळी ८ वाजता गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राम, लक्ष्मण, सीता आणि रावण
यांच्या वेशभूषेत सहभागी होत गुढीपाडव्याचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व उलगडले.
गुढीपाडव्याचे महत्त्व – प्रा. जया जोशी यांचे मार्गदर्शन
प्रभात फेरीनंतर पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. जया जोशी म्हणाल्या,
“गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तां पैकी एक आहे.
अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीचा पाडवा हे उर्वरित तीन शुभ मुहूर्त मानले जातात.
गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध करून अयोध्येत परत
आल्याने अयोध्या नगरी गुढ्या आणि तोरणांनी सजली होती.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या प्रतीक म्हणून महाराष्ट्रात गुढी उभारण्याची परंपरा आहे.”
पालक व मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला अशोक जोशी, प्रशांत देशमुख, प्रा. जया जोशी, प्रिय फुटाणकर,
निकिता शिंगणे, दिपाली फुटाणकर, पत्रकार एस. पी. शिंगणे, प्रसाद शिंगणे यांसह मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.
गुढीपाडवा हा संस्कृती आणि नवचैतन्याचा सण असल्याने शाळेत चिमुकल्यांसह पालकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.