महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरले आहेत,
त्यांच्या भविष्यासाठीही शिक्षण मंडळाने काही महत्त्वाचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
Related News
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
“जो सिंदूर मिटवेल, तो मातीत मिसळेल…
चूकूनही करू नका ही एक चूक
दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ATKT’ म्हणजेच Allowed To Keep Terms योजनेचा लाभ मिळणार आहे.
यानुसार जर विद्यार्थी एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण असेल,
तरी त्याला थेट अकरावीमध्ये प्रवेश घेता येणार आहे. मात्र बारावीपूर्वी त्या विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.
बोर्डाने याशिवाय श्रेणी सुधार (Grade Improvement) व गुण सुधार योजना (Marks Improvement) लागू केली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या निकालात अनुत्तीर्ण ठरलेला विद्यार्थी पुढील तीन सत्रांमध्ये — जून-जुलै २०२५,
फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६ — यापैकी कोणत्याही एका किंवा सर्व परीक्षांत पुन्हा सहभागी होऊ शकतो.
यामार्गे तो दहावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणक्रम सुरू ठेवू शकतो.
दरम्यान, यंदा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
यंदा मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४% तर मुलांची ९२.३१% इतकी आहे.
विद्यार्थ्यांसाठी या योजना म्हणजे दुसरी संधी ठरणार असून, शिक्षण थांबण्याऐवजी सुरू ठेवण्याची एक सकारात्मक दिशा ठरणार आहे.
शिक्षण क्षेत्रात या लवचिकतेमुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा उभे राहून यश मिळवण्याची संधी मिळणार आहे.
READ MORE HERE