माना पोलीस स्टेशन हद्दीतील कुरूम–माना रेल्वे मार्गावरील खांबा क्रमांक 636/25-27 जवळ अप ट्रॅकच्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा इसम रेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना 19 जून 2026 रोजी सकाळी 8.15 वाजण्यापूर्वी उघडकीस आली.
मृत इसमाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून उंची सुमारे 5 फूट आहे. त्याचा रंग निमगोरा, बांधा सडपातळ, चेहरा गोल असून केस काळे आहेत. अंगावर काळ्या चौकडीचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स होती. उजव्या हातावर ‘सुधिर’ असे गोंदलेले असून हातात काळा धागा बांधलेला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानंतर माना पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक 11/2026, कलम 194 BNSS प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Related News
हद्दवाढीनंतर अखेर प्रभाग ४ मध्ये कचरा गाडी दाखल; मोठी उमरीकरांना दिलासा!
22 वर्षांनंतरही लोकनेते अरुणजी दिवेकर यांच्या कार्याचा तेजस्वी वारसा कायम; अकोल्यात भावपूर्ण अभिवादन!
दहिहंडा तीर्थक्षेत्राचा ऐतिहासिक विकास! 2.50 कोटींच्या सुविधांसह भव्य लोटस सेलिब्रेशन हॉलचे लोकार्पण
अकोला तील दुष्काळावर आमदार रणधीर सावरकरांचा ‘मास्टर प्लॅन’! पाणीटंचाईवर उपायांसाठी 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आढावा बैठक
रावणदहनाचा खर्च टाळून शेतकऱ्यांना मदतीचा हात; अकोल्यातून ₹51 हजारांची मदत!
मुर्तिजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा! दीपक पाटील दांदळे यांना पुण्यात ‘हिंदूरत्न’ पुरस्काराने सन्मानित!
आपल्या मातीतील 30 रत्नांचा गौरव! अकोल्यात ‘अकोलारत्न’ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा भडका! राजन विचारे संतप्त, पोलिसांना विचारले ५ थेट सवाल
मुक्ताईनगरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा! आठ जण ताब्यात, रोख रकमेसह साहित्य जप्त
नांदेड शेतकरी मृत्यू प्रकरणाचा धक्कादायक खुलासा! 7 हजारांच्या कर्जासाठी ७५ हजारांची मागणी? मुख्य आरोपी फरार
Tiger Shroff गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; 17 तासांत दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात!
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची 2 हेक्टर 2 आर जमीन मुक्त; जिल्हा निबंधकांचा आदेश
सदर इसमाबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी माना पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
