अकोला – अकोल्यात मानवी संवेदनशीलतेला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मुक्या प्राण्यांना विषारी अन्न देऊन ठार मारल्याची घटना गुडधी परिसरात घडली असून,
या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
प्राप्त माहितीनुसार, रस्त्यावर भटकणारे मोकाट कुत्रे तसेच काही पाळीव कुत्रे अंगावर भुंकतात,
या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीने थेट विषारी औषध टाकलेले अन्न
देऊन जवळपास २५ पेक्षा अधिक कुत्र्यांना विषबाधा झाली.
विशेष म्हणजे, २४ तासांच्या आत या प्राण्यांनी प्राण सोडले, आणि काही अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.
हा प्रकार गुडधी भागात काल रात्री उघडकीस आला. परिसरात सतत कुत्र्यांच्या मृतदेह आढळून येत
असल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली.
स्थानिक नागरिकांनी जागरूकतेने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली,
त्यामध्ये एक व्यक्ती कुत्र्यांना खाण्यास काहीतरी देताना दिसतो.
त्यानंतर लगेच त्या प्राण्यांची प्रकृती बिघडल्याचेही कैद झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध सुरू केला आहे.
प्राणिप्रेमींमध्ये संतापाचा उद्रेक
या घटनेमुळे प्राणीप्रेमी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ते म्हणतात, “मुक्या जीवांचा असा अमानवीय संहार हा संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
अशा क्रूर व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.”