अकोला, दि. ४ : प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालयाकडून भारक्षमतेहून अधिक माल वाहून
नेणाऱ्या जड वाहनांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी
तब्बल २०० वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ३५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
या कारवाईत १० लाख रुपये महसूल शासनाकडे जमा करण्यात आला आहे. मोहिमेसाठी
४ कोटी रुपये महसूल संकलनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून,
त्यातील ६० टक्के संकलन फेब्रुवारीअखेर पूर्ण झाले आहे.
कायदेशीर सूचना वाहनचालक व मालकांसाठी:
- सर्व वाहनधारकांनी कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत.
- वाहन क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेऊ नये.
- वाहने चालविताना मोटार वाहन कायद्याचे पालन करावे.
- कोणत्याही दलाल किंवा असामाजिक घटकांच्या आमिषाला बळी पडू नये.
- तपासणी दरम्यान कोणतीही गैरप्रकार आढळल्यास RTO कार्यालयात तक्रार दाखल करावी.
ही मोहिम अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, प्रादेशिक परिवहन अधिकारी
रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि विभागीय पथक कार्यरत आहे.
वाहनधारकांनी कायद्याचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/shri-lakshwar-sansthanla-self-anantabhau-prabhakarrao-chatur-yanchaya-smritaprityartha-pani-tankar-bhet/