महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आ. हरिष पिंपळे यांच्या हस्ते लोकार्पण
मुर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर पूर्णा नदीच्या तीरावर असलेल्या पश्चिम विदर्भातील
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
श्री लक्षेश्वर संस्थान येथे दरवर्षी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
यात कावळ यात्रा, गणेश मूर्ती व देवी मूर्ती विसर्जन, सोमवती यात्रा आणि महाशिवरात्री महोत्सव यांचा समावेश आहे.
या धार्मिक कार्यक्रमांमध्ये हजारो भाविक सहभागी होतात.
भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने श्री लक्षेश्वर संस्थानचे परम भक्त चतुर परिवाराने
स्व. अनंताभाऊ प्रभाकरराव चतुर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थानला पाणी टँकर भेट दिला.
या टँकरचा उपयोग वर्षभर संस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी केला जाणार आहे.
महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी ह. भ. प. तुळशीदासजी धर्माळकर महाराज यांच्या
अध्यक्षतेखाली आणि आमदार हरिष पिंपळे यांच्या हस्ते या पाणी टँकरचे लोकार्पण करण्यात आले.
या वेळी चतुर परिवारातील आशिष चतुर (नागपूर), प्रा. जयंत चतुर (यवतमाळ), यशवंत चतुर (अमरावती),
पंकज चतुर (मुर्तिजापूर) यांसह हजारो शिवभक्त उपस्थित होते.
श्री लक्षेश्वर संस्थानच्या व्यवस्थापन समितीने आणि उपस्थित भाविकांनी चतुर परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले.
या पवित्र सेवाकार्यामुळे संस्थानातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/akola-mahaphaliyasamor-congresscha-movement-is-good-and-rakhdalelya-vikas-kamaan/