अकोट तालुक्यातील मौजे चंडिकापूर येथे पंधरावा वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या नाली व पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विक्रम रमेश इंगळे यांनी पंचायत समिती अकोटचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
तक्रारीनुसार, गावातील गोपाल मोरे ते श्रीकृष्ण चौधरी यांच्या घरापर्यंत तसेच रवींद्र वाशिमकार ते गोपाल वैद्य यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या कामांच्या दर्जाबाबत आणि खर्चाबाबत शंका उपस्थित करण्यात आली असून त्याची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी एक लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु प्रत्यक्षात काम न करता पूर्ण झाल्याचे दाखवून बिल काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे निधीचा अपहार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.तसेच, ग्रामपंचायत सदस्याने स्वतःच्या जागेत बोरवेल करून त्यावर वैयक्तिक मालकी हक्क गाजवल्याचाही मुद्दा तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
Related News
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! 10 हून अधिक भौतिक सुविधांचे दिमाखात लोकार्पण
कुरणखेड : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कुरणखेड येथील गजानन महाराज विद्यालयात शैक्षणिक ...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मानसिक आणि शारीरि...
Continue reading
अकोला शिक्षक बदली घोटाळ्यावर प्रशासनाचा मोठा प्रहार! 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली; 136 दोषींवर कठोर कारवाई
अकोला : अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील बहुचर्चित आंतर...
Continue reading
मोठा धक्का! अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; शहराच्या राजकारणात मोठी खळबळ
जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचा आदेश; तिन्ही न...
Continue reading
अकोट शहरातील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे. शाळेच्या संरक्षक भिंती अनेक ठिकाणी पडल्याने परिसरात मोकाट जनावरे व्यसनाधीन ...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या माकडाने मागील दहा दिवसांपासून धुमाकूळ घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. सुरुवातीला लीलाबाई रेखाते यांच्यावर हल्ला...
Continue reading
'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येदलापूर शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. छाप्यात ती...
Continue reading
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी उपाध्यक्ष आणि अकोला जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणात अकोट सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्याय...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धारूर गावात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी नवघन हरी सबाळ यांच्या म्हशीचा इलेक्ट्रिक पोलच्या तानाला (स्टे वायर) करंट लागल्याने जागी...
Continue reading
अकोल्यातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना कथितपणे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आल्याचा गंभीर दावा विधानसभेत करण्यात आला. या धमकीत राष्ट्रवादी...
Continue reading
आकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागरातून श्री संत वासुदेव महाराज पालखीचे पंढरपूर वारीसाठी भव्य प्रस्थान झाले. हरिनाम, अभंग, दिंडी, पुष्पवृष्टी, वारकऱ्यांना विमा सुरक्षा आणि शहरभर झा...
Continue reading
या सर्व प्रकरणात संबंधित ठेकेदार, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसचिव आणि कनिष्ठ अभियंता यांनी संगनमताने शासन निधीचा अपहार केल्याचा आरोप असून, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच अपहार झालेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे पंचायत समिती प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/dictator-kim-jong-un-threatens-america-with-atomic-bomb-and-consequences-for-global-politicians/