USAID : या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकी सरकारी दक्षता विभागाने DOGE खुलासा केला की,
भारतात निवडणुकीसाठी फंडिंग केली. त्यावर आता अर्थ मंत्रालयाच्या रिपोर्ट्मधून महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.
USAID च्या फंडिंगवरुन अमेरिका ते दिल्लीपर्यंत वाद सुरु आहे.
Related News
सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी होणार; अशोक खरात प्रकरणावर फडणवीसांची मोठी घोषणा
अशोक खरात प्रकरण सध्या राज्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरत असताना, या प्रक...
Continue reading
रश्मिका मंदानाच्या 6 सुपरहिट चित्रपटांनी तिला बनवले ‘नॅशनल क्रश’
भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रथम क्रमांकावर नाव घेतले तर ते आहे
Continue reading
उन्हाळ्यात कोणता हेल्थ ड्रिंक सर्वात चांगला? वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेला खास मार्गदर्शक
उन्हाळा म्हणजे शरीराची खरी परीक्षा. तापमान चढतं, घाम व...
Continue reading
Gold Rate , April 5, 2026: सोने जवळपास ₹30,000 ने घसरले; दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने–चांदी
Continue reading
एप्रिलपासून लागू होणारे नवीन कामगार कायदे: नोकरी सोडल्यानंतर फक्त 2 दिवसांत मिळणार फुल अँड फायनल सेटलमेंट; जाणून घ्या सविस्तर बदल
एप्रिल 1, 2026 पासून देशातील
Continue reading
Bigg Boss Marathi 6: अखेर एक मोठा निर्णय! ‘त्या’ स्पर्धकाला घराचा बाहेरचा रस्ता दाखवला? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण
Bigg Boss Marathi 6 आता...
Continue reading
अनियमित वेळेला झोपता? नवा अभ्यास देतो इशारा; हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका दुपटीने वाढतो
नवीन संशोधनाने झोपेच्या वेळेबाबत एक धक्कादायक सत्य समोर आणले आहे...
Continue reading
हेल्दी खाणं आता सोपं! जाणून घ्या ५ झटपट आणि चविष्ट Salad रेसिपीज ज्या तुमचं डायटिंग सोपं करतील
आजकाल आरोग्यदायी खाणं म्हणजे अवघड प्रक्रिया, भरपूर चिरणे, आणि इंस्टाग्रामवर दिसणाऱ्य...
Continue reading
स्ट्रोकमधील ‘गोल्डन अवर’: वेळेवर उपचार कसे वाचवतात मेंदूचे लाखो पेशी?
स्ट्रोक ही एक अतिशय गंभीर वैद्यकीय आपत्कालीन अवस्था आहे. यात प्रत्येक मिनिटाला र...
Continue reading
‘पिक्चर अभी बाकी है’: राघव चड्ढा यांचा AAP वर पलटवार; पंजाबवरील मुद्दे न घेतल्याच्या आरोपांना दिले उत्तर, ‘डिलिटेड पोस्ट्स’वरून वाद वाढला
आम...
Continue reading
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने उलटवला ग्रेड-3 फॅटी लिव्हर! म्हणाल्या—“जंक फूडची आणि दारूची सवय माझं आयुष्य उद्ध्वस्त करत होती”
बॉलिवूड अभिनेता
Continue reading
२० मिनिटांत बनवा प्रोटीनने भरलेला राजस्थानी चिला रायता; उन्हाळ्यासाठी परफेक्ट डिश!
उन्हाळ्यात जेवण हलकं, पचायला सोपं आणि तरीही पौष्टिक असावं अशी आपली सगळ्यांचीच इच्छा असते. अशावेळ...
Continue reading
या वादादरम्यान अर्थ मंत्रालयाने एक रिपोर्ट जारी केला आहे. यात फंडिंगबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत.
रिपोर्टमध्ये फंड संदर्भात सर्व डिटेल माहिती देण्यात आली आहे. USAID ने किती फंडिंग केली आणि त्याचा वापर कुठे झाला?.
अर्थ मंत्रालयाच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलय की, USAID ने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताला 7 प्रोजेक्ट्ससाठी 750
मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 65 अब्जची फंडिंग केली. यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कुठलीही फंडिंग झाली नाही.
अर्थ मंत्रालयाच्या रिपोर्ट्नुसार
USAID फंडिंग शेती, खाद्य सुरक्षा, जल, स्वच्छता, साफ-सफाई, ऊर्जा,
डिजास्टर मॅनेजमेंट आणि आरोग्याशी संबंधित प्रोजेक्ट्ससाठी होती. यूएसएडने जलवायु अनुकूल कार्यक्रम आणि
ऊर्जा दक्षता व्यवसायीकरणासाठी सुद्धा फंडिंग देण्याचं आश्वासन दिलं आहे. रिपोर्टमध्ये म्हटलय की, भारताला
अमेरिकेकडून 1951 सालापासून मदत मिळायला सुरुवात झाली. USAID कडून आतापर्यंत
भारताला 555 प्रोजेक्टसाठी 1700 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.
भारतात राजकीय लढाई सुरु झाली
या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकी सरकारी दक्षता विभागाने DOGE खुलासा केला की, यूनायटेड स्टेट्स एजेंसी फॉर इंटरनॅशनल
डेवलपमेंटने (USAID) भारतात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 21 मिलियन डॉलरच अनुदान दिलं होतं.
एलन मस्ककडे असलेल्या DOGE खात्याच्या या खुलाशावरुन भारतात राजकीय लढाई सुरु झाली आहे.
‘भारताकडे भरपूर पैसा आहे’
त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वक्तव्य केली. ते म्हणाले की, “आम्ही भारतात
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 21 मिलियन डॉलरची मदत देत आहोत, पण आमचं काय?.
आम्हाला पण मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे” ते म्हणाले की, “भारताला फंडची काही आवश्यकता नाही.
त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. अशा स्थितीत आम्ही भारताला निवडणुकीसाठी 21 मिलियन डॉलरची मदत का द्यावी?”
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर काय म्हणाले?
USAID फंडिंग वादावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली.
अमेरिकेकडून देण्यात आलेली माहिती चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. सरकार याची चौकशी करत आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/akot-talukat-mundagav-yehe-dar-darp-thousands-nadharanana-theate-labhacha-dilsa/