तेल्हारा (प्रतिनिधी):
गोपनीय माहितीच्या आधारे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलिसांनी उकळी बाजार येथील एका
राहिवाशाच्या घरावर छापा टाकून मोठा प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा जप्त केला.
Related News
या कारवाईत विशाल अंभोरे या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
२५ हजारांचा देशी दारू साठा जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल अंभोरे याच्या घराची झडती घेतली असता सुमारे २५ हजार
रुपये किमतीचा देशी दारूचा साठा आढळून आला.
ही दारू अवैधरित्या साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
सध्या तेल्हारा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी या प्रकरणाचा पुढील तपास करत
असून आरोपीकडून या दारूचा स्त्रोत, तसेच कुठे आणि कशासाठी
साठवणूक करण्यात आली होती, याचा शोध घेत आहेत.
