बोरगाव मंजू (प्रतिनिधी):
राष्ट्रीय महामार्गावर धावत असलेल्या टाटा सुमो वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना
८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.
Related News
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल
दारूवरील करवाढीविरोधात अकोल्यात वाईन बार बंद; शासनाला बेमुदत बंदीचा इशारा
“विधानसभा अध्यक्ष झोपेत आहेत”; महिला शोषण प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांचा ठिय्या आंदोलनात संताप
राहुल गांधींच्या प्रचार वाहनातून कन्हैया-पप्पूला खाली उतरवले; राजकारणात ‘राजकुमारगिरी’चा आरोप
आयुष्मान कार्डमुळे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; पात्रता आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या!
अकोल्यात श्री सत्यसाई सेवा समितीच्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन
राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात?
अकोल्यात भाजीपाल्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, बडनेरा येथून अकोल्याच्या दिशेने निघालेल्या टाटा सुमो (MH-27-AC-3738) वाहनात तीन महिला,
एक चिमुकला, चालक व इतर प्रवासी अशा एकूण नऊ जणांचा प्रवास सुरू होता.
दरम्यान गाडी बोरगाव मंजू जवळ आली असताना चालकाच्या लक्षात गाडीमधून धूर निघत असल्याचे आले.
त्याने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली व सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
गाडी झाली भस्मसात, प्रवाशांची सुटका
प्रवाशांना बाहेर काढताच काही क्षणांतच गाडीने अचानक पेट घेतला व संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
काही क्षण उशीर झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.
प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकत “दैव बलवत्तर म्हणून वाचलो,” अशी प्रतिक्रिया दिली.
घटनास्थळी एकच झुंबड
आगीचे दृश्य पाहण्यासाठी महामार्गावर बघ्यांची गर्दी जमली होती.
दरम्यान, पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य हाती घेतले.
या घटनेचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.