मुंबई : प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि दोन टर्म खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कापून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने यंदा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निकम फॉर्म भरणार आहेत. मी राजकारणात प्रवेश केल्याबद्दल टीका करणाऱ्या लोकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे नक्की त्यांच्या शैलीत उत्तर देतील, असा विश्वास उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला.
अॅड. उज्ज्वल निकम काय म्हणाले?
माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचं स्थित्यंतर आज घडून येत आहे. श्रीगणेशा चरणी नतमस्तक होण्याकरता जात आहे. आशीर्वाद घेण्यासाठी जातोय. राजकारणात उतरल्या बरोबर अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनाप शनाप बोलण्यात आलं. माझ्यावर संस्कृतीचा पगडा आहे, त्यामुळे मी त्या भाषेत बोलणार नाही. बेछूट, बेलगाम, खोट्या आरोपांना जनता उत्तर देईल, असा विश्वास उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला.
शक्तिप्रदर्शनासाठी कोणते नेते येणार याची कल्पना नाही. मात्र आमची महायुती आहे, यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे नेते उपस्थित राहण्याची शक्यता निकम यांनी व्यक्त केली.राज ठाकरे यांची भेट घेतल्याबद्दलही निकमांनी उत्तर दिलं. “राज साहेबांचा स्पष्ट वक्तेपणा आणि जे आहे ते जनतेला भावतं. मी राजकारणात येतो असं म्हटल्यानंतर बोलणाऱ्या लोकांना राज ठाकरे नक्कीच त्यांच्या शैलीत उत्तर देतील, असा विश्वासही अॅड. उज्ज्वल निकम यांनी यावेळी बोलून दाखवला.
Related News
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
सुशांत सिंह राजपूतची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्याचा खुलासा, काय म्हणालेला सुशांत त्याला?
शिंदेगट आणि ठाकरेगट आमनेसामने; प्रताप सरनाईक आणि नरेश मणेरा यांच्यात चुरशीची लढत
Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?
अकोट आगार बनले समस्यांचे माहेर घर!
- By अजिंक्य भारत
हरियाणात अमित शहा केंद्रीय निरीक्षक
शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवाराचे बॅनर फाडले,चर्चांना उधाण
साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार
तू भारताचा अभिमान, प्रत्येकासाठी प्रेरणा’
- By अजिंक्य भारत