छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षात प्रवेश करणारे डॉ. दिनेश परदेशी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. परदेशींनी ठाकरे गटाला
‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक
Related News
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
लढलेल्या परदेशींना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी परतीचा रस्ता धरल्याचे दिसते.
परदेशी उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुरेश बनकर यांची भाजपमध्ये
घरवापसी होऊन दहा दिवसही लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे कोकणात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर जोरावर असताना मराठवाड्यात भाजपचं ‘मिशन परत फिरा रे’ अॅक्टिव्ह झाल्याची चर्चा आहे.
कोण आहेत डॉ. दिनेश परदेशी?
दिनेश परदेशी हे वैजापूरचे माजी नगराध्यक्ष आहेत. १५-२० वर्ष परदेशी दाम्पत्याने वैजापूर नगरपालिकेवर सत्ता भूषवली.
त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिली.
त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर ठाकरे गटात भव्य पक्षप्रवेश केला.
वैजापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवली.
मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे डॉ. रमेश बोरनारे यांनी पुन्हा विजयाचा गुलाल उधळला.
९२ हजार मतं मिळवून, जवळपास ४० हजार मतांच्या फरकाने परदेशी पराभूत झाले.
बनकरांचीही घरवापसी
दुसरीकडे, अब्दुल सत्तार यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.
त्यानुसार भाजपला सोडचिठ्ठी देत ‘मशाल’ हाती घेतलेल्या सुरेश बनकर यांना विजयाचा गुलाल उधळता आला नाही.
त्यानंतर अडीच महिन्यांच्या काळात सुरेश बनकर यांनीही भाजपचा झेंडा पुन्हा हाती धरला.