विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर

विदर्भ

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी

विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून आज मनसेचा

7 वा उमेदवार जाहीर केला. मराठवाड्यातील दौऱ्यानंतर काही

Related News

दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याला गोंदिया,

भंडाऱ्यातून सुरुवात केली. अपेक्षानुसार राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यातही

विदर्भातील काही महत्त्वाच्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली.

गडचिरोलीमधून चंद्रपूरला पोहोचललेल्या राज ठाकरेंनी चंद्रपुरातून

मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावांची गुरुवारी रात्री घोषणा केली होती.

त्यानंतर, आज वणी मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

त्यामुळे, विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंनी तीन उमेदवार घोषित केले असून

यापूर्वी 4 उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे, मनसेचे

आत्तापर्यंत एकूण 7 उमेदवार जाहीर झाले आहेत.

वणी येथील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी छोटेखानी भाषण करताना

वणी मतदारसंघासाठी आगामी विधानसभेचा मनसेचा उमेदवार जाहीर केला.

मनसेकडून राजू उंबरकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकांचं

तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी

एकच जल्लोष केला. दरम्यान, येथील भाषणात राज ठाकरेंनी बदलापूरच्या

घटनेचा उल्लेख करत, मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय बाहेर काढला,

तेव्हाच पीडितेच्या न्यायासाठी सर्वजण पुढे आल्याचं म्हटलं.

तसेच, आज छत्रपती शिवाजी महाराज असायला हवे होते, त्यांच्या काळात

महिला अत्याचारांवरील घटनांना ज्यप्रमाणे चौरंगा शिक्षा व्हायची,

तशीच शिक्षा आजही महिला अत्याचारांतील आरोपींना द्यायला हवी,

असे राज ठाकरेंनी म्हटले. तसेच, एकवेळ माझ्याहाती सत्ता द्या,

असे आवाहनही राज यांनी येथील मेळाव्यात केले.

Read also: https://ajinkyabharat.com/many-districts-of-the-state-will-receive-heavy-rains/

Related News