बार्शीटाकळी : ग्रामीण भागात शिक्षण, संस्कार आणि सामाजिक उन्नतीचा वारसा जपण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या उत्कर्ष फाउंडेशन, काजळेश्वर यांच्या वतीने आयोजित ‘श्रीमद् भागवत सप्ताह’ निमित्त भव्य कीर्तन सोहळा नुकताच भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता.
या प्रसंगी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे (अकोला) यांनी आपल्या प्रभावी वाणीतून भक्तिरसाचा वर्षाव केला. अध्यात्म आणि समाजप्रबोधन यांची सुंदर सांगड घालत त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मानवी जीवनातील चांगल्या संस्कारांचे महत्त्व, नैतिक मूल्यांची गरज आणि भक्तीमार्गाची ताकद यावर त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी आणि विचारप्रवर्तक कीर्तनामुळे भाविकांना हरिकीर्तनाचा दिव्य अनुभव लाभला.
कार्यक्रमास मा. श्री. विशाल दादा गावंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थितांना सामाजिक कार्यात सक्रिय सहभागाची नवी दिशा मिळाली. ग्रामीण विकासासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण, संस्कार आणि एकजूट यांच्या बळावरच समाजाची खरी प्रगती शक्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Related News
‘Hanuman Ansh सिनेमाला प्रेमानंद महाराजांची मोठी वॉर्निंग; निर्मात्यांना नेमकी कसली होती भीती? २ कोटींच्या बजेटमध्ये ५० कोटींची कमाई
अध्यात्म, भक्ती आणि महान संतांच्या जीवनावर आधा...
Continue reading
‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या 137व्या...
Continue reading
बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर वीज वितरण कंपनीच्या अखत्यारितील 11 गावांमध्ये कर्मचारी टंचाईमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. एका लाईनमनवर संपूर्ण परिसराची जबाबदारी असल्याने शेतक...
Continue reading
व्हायरल वैदूच्या व्हिडिओंवर अभिनेता गिरीश परदेशी यांनी स्पष्ट भूमिका घेत लहान मुलांच्या संस्कार, सोशल मीडिया प्रसिद्धी आणि पालकांच्या जबाबदारीवर भाष्य केले. जाणून घ्या संपूर्ण प्रक...
Continue reading
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे जितका चर्चेत असतो, तितकाच तो आपल्या साधेपणा आणि मराठमोळ्या स्वभावासाठीही ओळखला जातो. अने...
Continue reading
अकोला, प्रतिनिधी : श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले असता विविध सामाजिक संस्थांनी भाविकांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबवले. याच पार्श...
Continue reading
महागाव तहसील कार्यालयास ‘गोदावरी अर्बन’कडून वॉटर कुलर भेट; नागरिकांना मिळणार शुद्ध व थंड पाण्याची सुविधा
सामाजिक बांधिलकी जपत बँकिंग सेवेसोबत समाजोपयोगी उपक्रम राबवि...
Continue reading
Latur News: 10 वर्षांच्या अरविंदची प्रेरणादायी कामगिरी! शाळेच्या पहिल्याच दिवशी 16 किमी धावत गाठली शाळा, देशभरातून कौतुक
लातूर: आजच्या डिजिटल य...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपरिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. बार्शीटाकळी नगरपरिषदेतील काँग्रेस, राष्ट...
Continue reading
मोर्णा नदीवरील पुलाची उंची वाढवा; १७ ते १८ गावांचा प्रश्न ऐरणीवर – ग्रामस्थांचा तीव्र इशारा
अकोला व अमरावती जिल्ह्यांना जोडणाऱ्या अदुरा–गांधीग्राम मार्गावरील मोर्णा नदीवरील पुलाची...
Continue reading
70 फूट खोल विहिरीत कोसळली बैलजोडी; ग्रामस्थांच्या थरारक प्रयत्नांनी सर्जा-राजाचा जीव वाचला
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी गावात रविवारी सकाळी घडल...
Continue reading
सहजीवनाची प्रेरणादायी 44 वर्षे! ॲड. लखनसिंह कटरे आणि सौ. उषादेवी कटरे यांच्या यशस्वी संसाराचा गौरवशाली प्रवास
दोन व्यक्तींचे एकत्र येणे आणि आयुष्यभर सुख-दुःखात एकमेकांची साथ देत क...
Continue reading
उत्कर्ष फाउंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संस्था समाजात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. या कीर्तन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनातून संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निखिल किशोर पवार यांनी यावेळी सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडावेत, त्यांच्यात मूल्याधिष्ठित विचार वाढावेत आणि समाज प्रगतिपथावर जावा, यासाठी आमचे फाउंडेशन सदैव कटिबद्ध राहील.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश गोपाल चव्हाण तसेच उत्कर्ष फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व सहकारी, ग्रामस्थ आणि उपस्थित भाविकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकात्मता आणि संस्कारांचा संदेश देणारा ठरला.
read also : https://ajinkyabharat.com/which-fruits-should-be-eaten-and-which-should-be-avoided-for-diabetic-patients/