अकोला, प्रतिनिधी : श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले असता विविध सामाजिक संस्थांनी भाविकांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबवले. याच पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट **’आऊट ऑफ सिलॅबस’**च्या टीमने सिंधी कॅम्प परिसरात पालखीतील भाविकांसाठी मोफत चहा व बिस्किट वाटपाचा उपक्रम आयोजित केला. या सेवा उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
'आऊट ऑफ सिलॅबस' चित्रपटाच्या निमित्ताने मोटार वाहन निरीक्षक त्रिवेणी घोलप यांची प्रतिक्रिया pic.twitter.com/rsU4jVgqnA
— Journalist pravin (@Journalist45471) June 25, 2026
Related News
या प्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथील मोटार वाहन निरीक्षक त्रिवेणी घोलप यांनी स्टॉलला भेट देऊन चित्रपटाच्या संकल्पनेचे तसेच टीमच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, ‘आऊट ऑफ सिलॅबस’ हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला विचार करायला लावणारा आणि विशेषतः तरुण पिढीला सकारात्मक दिशा देणारा आहे. अशा आशयघन चित्रपटांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय, चित्रपटाच्या प्रचारासोबत समाजसेवेची जोड देत भाविकांसाठी चहा व बिस्किटांचे मोफत वाटप करण्याच्या उपक्रमाचे त्यांनी विशेष स्वागत केले. धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
पालखी सोहळ्यादरम्यान शेकडो भाविकांनी या सेवा उपक्रमाचा लाभ घेतला. उपस्थितांनीही ‘आऊट ऑफ सिलॅबस’ चित्रपटाच्या टीमच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे चित्रपटाचा प्रचार आणि समाजसेवेचा संदेश एकाच वेळी प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचत असल्याची भावना व्यक्त केली.
