वकान्यात राजकीय दिग्गजांची मांदियाळी! श्रीकांत शिंदे, सचिन अहिर यांची उपस्थिती

श्रीकांत शिंदे

वकाना येथे २२ नोव्हेंबरला राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचा भव्य सोहळा; श्रीकांत शिंदे, सचिन अहिर राहणार उपस्थित!

सैनिक परिवारांचा होणार सन्मान; कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन, संस्थापक अध्यक्ष अविनाश तायडे यांचे नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

संग्रामपूर : तालुक्यातील वकाना (रुधाना) येथे राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, २२ नोव्हेंबर रोजी कार्यकर्ता मेळावा आणि सैनिक परिवार सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिनभाऊ अहिर आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रविवारी सायंकाळी ५ वाजता श्री संत सावता माळी मंगल कार्यालय परिसरात हा सोहळा पार पडणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून सचिनभाऊ अहिर आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहतील. याशिवाय जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि शिवसेना युवासेनेचे समन्वयक अनिकेत जावळकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

Related News

या सोहळ्याला संत परंपरेतील मान्यवरांचे आशीर्वादही लाभणार आहेत. संत सावता माळी महाराज यांचे वंशज ह.भ.प. सावता महाराज वसेकर आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. अनिकेत महाराज मोरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यात राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार असून, प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच आगामी काळातील सामाजिक उपक्रम आणि संघटनेच्या पुढील वाटचालीचे नियोजन यावर चर्चा होणार आहे.

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर आणि विविध ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान हा या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे. सैनिकांच्या त्याग, समर्पण आणि देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या योगदानाचा गौरव करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

राष्ट्रहित, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे.

या भव्य सोहळ्याला संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश सारंगधर तायडे यांनी केले आहे.

 

Read Also :  https://ajinkyabharat.com/eknath-shinde-9/

Related News