बदलत्या हवामानाचा फटका : रब्बी हंगामातील मका व हरभरा पिके धोक्यात, शेतकरी संकटात

रब्बी

संपूर्ण राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत बदलणाऱ्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कधी अचानक थंडी वाढते, कधी दाट धुक्याचे वातावरण निर्माण होते, तर कधी तीव्र ऊन पडत असल्याने पिकांची वाढ विस्कळीत झाली आहे.

या अस्थिर हवामानाचा सर्वाधिक फटका मक्याच्या पिकाला बसला असून अनेक भागांत लष्करी अळीचा (Fall Armyworm) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. अळीच्या प्रादुर्भावामुळे मक्याच्या पिकावर सध्या मोठ्या प्रमाणावर फवारणी सुरू असून, तरीही उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

इतकेच नव्हे, तर हरभरा पिकावरही याच अळीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने हरभऱ्याच्या उत्पादनावरही संकट ओढावले आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, हवामान असेच राहिल्यास राज्यातील मका व हरभऱ्याच्या एकूण उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related News

पिके वाचवण्यासाठी सतत फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, हे ढगाळ व अस्थिर वातावरण लवकरात लवकर निवळावे आणि पिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा राज्यभरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

read also :  https://ajinkyabharat.com/8th-pay-commission-5-major-historic-decisions/

Related News