दहीहंडा | प्रतिनिधी
दहीहंडा येथील शोएब किराणा स्टोअर या दुकानाला 10 एप्रिल रोजी सायंकाळच्या
सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
हे दुकान नियमत उल्ला खान सन्नाउल्ला खान यांच्या मालकीचे असून, उर्दू जिल्हा परिषद
शाळेजवळ त्यांच्या घरालगत आहे. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग
लागली आणि संपूर्ण दुकान काही क्षणातच जळून खाक झाले.
आगीत किराणा माल, इलेक्ट्रिक बोर्ड, फ्रीज, कपड्यांचे लाकडी कौंटर व इतर वस्तू पूर्णपणे जळून गेल्या.
नियमत उल्ला खान हे अत्यंत गरिब कुटुंबातून असून, त्यांचे संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे.
या आगीत त्यांच्या उपजीविकेचा प्रमुख आधारच नष्ट झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
या घटनेबाबत दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.