भाजपकडून राज्यसभेसाठी ९ उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्रातून

महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काहीच दिवसांनी देशात

राज्यसभेची निवडणूक होणार आहे . ९ राज्यांमध्ये राज्यसभेच्या

Related News

एकूण १२ जागा रिक्त झाल्या आहेत. १२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी

मतदान होणार आहे. भाजपच्या नेतृत्त्वात एनडीए १२ पैकी ११ जागांवर

निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांची

घोषणा केली आहे. ९ राज्यांमध्ये भाजपने आपले ९ उमेदवार घोषित केले आहेत.

केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना राजस्थान, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन

यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय हरियाणातून किरण चौधरी, ओडिशातून ममता मोहंता

तर, त्रिपुरामधून राजीव भट्टाचार्जी निवडणुकीसाठी उभे आहेत.

तर महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, बिहारमधून मनन कुमार मिश्र आसाममधून

रंजन दास यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या

निवडणुकीत आसाम, बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी २ जागांवर

निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश, त्रिपुरा, हरियाणा, ओडिशा आणि तेलंगणा

या राज्यात एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. तेलंगणाची जागा सोडून

१२ पैकी ११ जागांवर भाजप व त्यांचे सहकारी पक्ष निवडणूक लढविणार आहेत.

म्हणजेच या जागांवर भाजपचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे.

असे झाल्यास राज्यसभेत भाजपची संख्या १०० होईल. राज्यसभेत सध्या २०

जागा रिक्त आहेत. सद्य स्थिती २२५ खासदार राज्यसभेत आहेत. म्हणजेच

बहुमताचा एकदा ११३ इतका आहे. यात भाजपकडे ८७ सदस्य आहेत.

तर एनडीएकडे १०१ आहेत. एनडीएला ७ खासदारांचा देखील पाठिंबा आहे.

वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य हे भाजपकडे आहेत.

काँग्रेसकडे ३९ उमेदवार असून ते दुसऱ्या क्रमांकांवर आहेत.

तर तृणमूल काँग्रेसकडे १७ खासदार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/farmers-will-soon-get-rs-2000/

Related News