65 टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द..
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना
पाटणा हायकोर्टाने सर्वात मोठा झटका दिला आहे.
Related News
Bangladesh सोबतचा गंगा जल करार संपणार; बिहारच्या मागणीमुळे नवा पेच, भारताच्या निर्णयाकडे लक्ष
1996 चा गंगा जलवाटप करार डिसेंबर 2026 मध्ये संपणार; बिहारच्या पाण्याच्या हक्काचा मुद्...
Continue reading
शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
विधीमंडळातील संख्याबळाच्या चाचणीवर शिंदे गटाचा भर; ‘विवेकाधिकाराचा...
Continue reading
शिवसेना चिन्ह सुनावणी : शिंदे गटाच्या वकिलांचा भावनिक युक्तिवाद; ‘कार्यकर्ते हेच पक्षाचा प्राण’ म्हणत ठाकरे गटावर निशाणा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्त...
Continue reading
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी : उद्धव ठाकरेंना धक्का देणारा शिंदे गटाचा दावा; ‘पक्षप्रमुख’ पदावरून सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्व...
Continue reading
राज्यात आरक्षणावरून संघर्ष; OBCना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा डाव असल्याचा नाना पटोलेंचा गंभीर आरोप
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पुन्हा एकदा तापले असून मराठा आणि OBC सम...
Continue reading
सीजेपीच्या आंदोलक विद्यार्थ्याला 5 लाखांची नोटीस; सरन्यायाधीश सूर्यकांत संतप्त
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यार्थ्यावर कारवाईचा प्रयत्न? मॅजिस्ट्रेटला उत्तर देण्याचे आदे...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवर शरद पवार म्हणाले, ‘कोर्टाचा निकाल येईल, त्याआधी भाष्य करणं योग्य नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याची शक्यता; साखरेचे दर, पावसाची स...
Continue reading
अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “अप्रिय घटना होईल असे ठोस कारण नाही”
कॉक्रोच जनता पार्टीचे अध...
Continue reading
आरक्षणाचा प्रश्न आणखी पेटणार? भटक्या-विमुक्त समाजही रस्त्यावर उतरणार; मंत्री संजय राठोड यांचा इशारा
महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मराठा आणि ओबीसी सम...
Continue reading
सुप्रीम कोर्टाच्या आगामी निकालाला शिंदे गटाचे मंत्री-आमदार घाबरले का? सचिन अहिर यांचं मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्षातील फुटीनंतर निर्माण झालेल...
Continue reading
पॅलेट गन पीडितासह राहुल गांधी यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; पोलिसांवर गंभीर आरोप काय?
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याच्या आरोपावरून दिल्लीतील राजकीय वातावरण प...
Continue reading
आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावरुन 65 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय
हायकोर्टाने रद्द केला आहे.
नितीश कुमारांना हा मोठा धक्का आहे.
नितीश कुमार सरकारने बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा
50 टक्क्यावरुन 65 टक्क्यांवर नेला होता.
नोकरी आणि शिक्षणात हे वाढीव आरक्षण देण्यात आलं होतं.
मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातीचं सर्वेक्षण केलं होतं.
त्यावेळी ते राज्यात आरजेडी आणि काँग्रेससोबत महाआघाडीच्या सरकारसोबत होते.
जात सर्वेक्षणाचं काम घाईघाईनं करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
त्यानंतरच नितीश कुमार यांच्या सरकारनं मागास, अतिमागास,
एससी आणि एसटीचं आरक्षण 65 टक्के करण्याचा आदेश जारी केला होता.
सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाची मर्यादा 50 टक्के निश्चित केलेली,
त्यामुळे नितीश सरकारचा हा निर्णय न्यायालयात टिकणार नसल्याचं त्याचवेळी स्पष्ट दिसत होतं.
अशातच आता पाटणा हायकोर्टाने सीएम नितीश कुमार यांचा
आरक्षण वाढवण्याचा आदेशही रद्द केला आहे.
नितीश कुमार सरकारने एससी, एसटी, ईबीसी
आणि इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्था आणि
सरकारी नोकऱ्यांमध्ये 65 टक्के आरक्षण दिलं होतं.
या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका स्वीकारताना,
बिहार सरकारने आणलेला कायदा रद्द करून,
पाटणा उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला.
या प्रकरणात, गौरव कुमार आणि इतरांनी दाखल केलेल्या
याचिकांवर सुनावणी झाली.
त्यानंतर याबाबतचा निर्णय 11 मार्च 2024 पर्यंत राखून ठेवला होता, तो आज देण्यात आला.
बिहार सरकारकडून महाधिवक्ते पी के शाही यांनी कोर्टाला सांगितले की,
सध्याच्या परिस्थितीत या वर्गाला पुरेसे प्रतिनिधित्व नाही.
त्यामुळे राज्य सरकारने हे आरक्षण दिले होते.
या याचिकांमध्ये राज्य सरकारने 9 नोव्हेंबर 2023 रोजी केलेल्या कायद्याला
आव्हान देण्यात आले होते.
यामध्ये एससी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गीयांना
65 टक्के आरक्षण देण्यात आले होते.
तर सरकारी सेवेत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना केवळ 35 टक्के पदेच देण्यात येत होती.
Read also: https://ajinkyabharat.com/neeraj-chopracha-again-suvarnavedh/