अकोला जिल्ह्यात आज पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल पहायला मिळाला.
दिवसभर वाढलेल्या उष्णतेनंतर सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अकोला शहरासह अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
विशेषतः अकोल्यातील पणज परिसरात केळी पिकांना मोठा फटका बसला आहे.
जोरदार वाऱ्यांमुळे केळीची झाडे आडवी झाली असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कालही जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली होती आणि आज पुन्हा पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवसही असाच बदलता वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-muslim-bandwankadun-operation-sindoor/