पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?

पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार? IPL 2025 च्या प्लेऑफपूर्वी निर्णायक सामना धोक्यात

अकोला : आयपीएल 2025 च्या प्लेऑफ शर्यतीत निर्णायक वळण आले असतानाच,

आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अत्यंत

महत्त्वाचा सामना रंगणार आहे. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

Related News

मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे,

ज्यामुळे हा सामना धुतला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या सामन्याचे महत्त्व लक्षात घेता, हा सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना एकेक गुण दिला जाईल.

अशा परिस्थितीत प्लेऑफचे गणित अधिकच गुंतागुंतीचे होणार असून मुंबई इंडियन्सला अखेरचा

सामना पंजाब किंग्जविरुद्ध जिंकणं अत्यावश्यक ठरेल.

अन्यथा रोहित शर्मा आणि कंपनीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागू शकतं.

दरम्यान, BCCI ने सामन्यांसाठी अतिरिक्त वेळ एक तासावरून दोन तासांपर्यंत वाढवला आहे,

जेणेकरून पावसाच्या व्यत्ययानंतरही सामना खेळवता येईल. मात्र,

हवामानातील सुधारणा झाली नाही, तर आयपीएलच्या या हाय-वोल्टेज लढतीवर पावसाचा फटका बसेल हे निश्चित.

Read Also : https://ajinkyabharat.com/uddanpulachaya-badar-savar-shiva/

Related News