उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;

उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;

अकोल्यातील न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण

भागात येण्या जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलाचे काम सध्या सुरू आहे.

मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत आज शिवसेना

Related News

ठाकरे गटाकडून या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी ठाकरेंच्या

शिवसैनिकांनी मोठी घोषणाबाजी केली. दरम्यान भाजप च्या लोकप्रतिनिधी यांच्याकडून उड्डाणपूलाच्या

कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केलाय. दरम्यान या

आंदोलना दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

अधिकाऱ्यांकडून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय.

या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/gaushevecha-sankalp-ghet-vidyarthyanani-anubhavale-gomateche-importance/

Related News