नवी दिल्ली/बीजिंग : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला असून
दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे चीनची धडधड वाढली आहे.
भारताने दहशतवादाविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान बिथरलेला असताना,
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
चीनने यावर प्रतिक्रिया देत “दहशतवादाचा आम्ही तीव्र विरोध करतो” असे स्पष्टपणे म्हटले आहे.
चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी स्पष्ट केले की, “भारत-पाकिस्तान हे दोघेही
आमचे शेजारी आहेत आणि दोघांनी संयम बाळगून, शांतता आणि स्थैर्याच्या दिशेने पावले टाकावीत.“
त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे पालन करण्याचे आवाहनही केले.
चीनची काळजी का वाढली?
भारत-पाकिस्तानमधील युद्धसदृश परिस्थितीमुळे चीनने मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे.
त्यामागे चीनचा पाकिस्तानमधील अब्जावधी डॉलर्सचा गुंतवणूकधोका आहे.
विशेषतः सीपेक (CPEC) प्रकल्प आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI)
अंतर्गत झालेला मोठा आर्थिक व्यवहार धोक्यात येण्याची शक्यता असल्याने चीन कोणत्याही प्रकारच्या युद्धाला विरोध करत आहे.
2005 ते 2024 दरम्यान, चीनने पाकिस्तानमध्ये जवळपास 68 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे ही गुंतवणूक वाया जाऊ शकते, याचीच मुख्य भीती चीनला सतावत आहे.
चीनने आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “आम्ही दोन्ही देशांना शांततेच्या मार्गावर यावे यासाठी प्रयत्नशील
आहोत आणि इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत काम करण्यास तयार आहोत.“