Sunita Williams net worth : तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती?
नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम Sunita Williams net worth : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने
जून 2024 मध्ये अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर पाठवले होते.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
मात्र, 9 महिने दोघेही अंतराळात अडकून पडले होते. दरम्यान, आज (दि.19) अखेर सुनीता विल्यम्स
आणि बुच विल्मोर या दोघांनी पृथ्वीवर आगमन केलंय.सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांपेक्षा
अधिक काळ अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर पोहोचले आहेत. दोघेही सुरक्षितरित्या पृथ्वीवर उतरले आहेत.
कॅप्सुल उघडल्यानंतर दोन्ही अंतराळवीरांना स्ट्रेचरवरुन आणण्यात आलंय.सुनीता विल्यम्स यांनी आत्तापर्यंत तीन वेळेस गगनभरारी घेतली आहे.
दरम्यान, सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? आणि नासाकडून त्यांना किती पगार दिला जातो ? हे जाणून घेऊयात..मीडिया रिपोर्ट्सनुसार
सुनीता विल्यम्स यांची संपत्ती 5 मिलियन डॉलर आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार सुनीता विल्यम्स यांच्या संपत्तीचा आकडा 43 कोटींपेक्षा जास्त आहे.
नासाचे अंतराळवीर फेडरल नोकरदार आहेत. त्यांना जीएस 15 ग्रेड नुसार पगार दिला जातो.
या अंतराळवीरांसाठी नासाकडून वर्षाला 125,133 डॉलर ते 162,672 डॉलर इतकी रक्कम मोजली जाते.
भारतीय चलनानुसार नासाच्या अंतराळवीरांचा पगार 1.08 कोटी ते 1.41 कोटी इतका आहे.दरम्यान,
सध्या सुनीता विल्यम्स यांच्या या मोहिमेचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.