संत तुकाराम महाराज पालखीने केला रोटी घाट पार

रोटी घाट

रोटी घाट पार करण्यासाठी यंदा सालाबादप्रमाणे

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला

जादाच्या ८ बैलजोड्याची म्हणजेच एकूण १६ बैलांची मदत घ्यावी लागली नाही.

Related News

यंदा पालखी रथाच्या ५ बैलजोड्या कमी करून

तीन बैलजोड्या जादा लावून एकूण ६ बैलांच्या मदतीने पालखी रथाला

घाटातून रोटी गावच्या दिशेने ओढत नेत घाट पार केला.

श्री क्षेत्र देह ते पाटस या दरम्यान पायी चालत आलेला

जगगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रोटी घाटातील

मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यांनी टिपण्यासाठी पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील

भाविकांनी व पालखी सोहळ्यातील वैष्णवांनी मोठी गर्दी केली होती.

गेल्या १५ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असल्याने

रोटी घाट परिसर हिरवाईने नटलेला आहे.

यंदा पालखी सोहळा नागरिकांना रोटी घाटात वेगळेच धार्मिक चैतन्य निर्माण करून

आनंद देऊन गेला. अनेकांनी रोटी घाटातील पालखी सोहळ्याचे

मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यासह मोबाईलमध्ये कैद करत सेल्फी काढल्या आहेत.

हिरवाईने नटलेल्या परिसरातील नागमोडी वळणाच्या रोटी घाटात

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी दुपारी

पावणेबारा वाजताच्या सुमारास दाखल झाला.

दुपारी १ वाजताच्या सुमारास पालखी सोहळ्याने अधिकच्या तीन बैलजोड्या घेत रोटी घाट पार केला.

टाळ मृदुंगात विठ्ठल पांडुरग, संत तुकाराम महाराजांच्या जयघोष करीत अवघा घाट दुमदुमून गेला होता.

घाटातील पालखी दृश्य पाहण्यासाठी दौंड तालुकासह

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कौठा, सिद्धटेक, राशीन तालुक्यासह

इंदापूर, बारामती, शिरूर, हवेली, पुरंदर तालुक्यासह बाहेरील नागरिकानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Read also: https://ajinkyabharat.com/brs-chief-mla-in-congress/

Related News