के. चंद्रशेखर राव यांना धक्का
तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस)
६ विधानपरिषदेच्या आमदारांनी गुरुवारी रात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Related News
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ; आता तीन राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाबमध्ये शिक्षण...
Continue reading
धक्कादायक! 2 टप्प्यांत पतीची हत्या; गच्चीवरून ढकलल्यानंतर सलाईनमध्ये टॉयलेट क्लिनर टाकल्याचा आरोप
पतीची हत्या : तेलंगणातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारे हत्याकांड समो...
Continue reading
डॉ. शमशीर वायलील; 2.6 कोटींच्या मदतीने कुटुंबांना दिला दिलासा
दुबईच्या एमिरेट्स रोडवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय कामगारांच्या कुटुंबांसाठी यूएईतील भारतीय उद्...
Continue reading
तेलंगणातील करीमनगर येथे 55 वर्षीय महिलेला कामाच्या बहाण्याने शेतात नेऊन दागिने लुटल्यानंतर विहिरीत ढकलण्यात आले. तब्बल 21 तास मृत्यूशी झुंज देत महिलेने स्वतःचा जीव वाचवला. आरोपीने ...
Continue reading
नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकातून चोरीला गेलेली तब्बल 1 कोटी 53 लाख रुपये किमतीची 'शिवाई' इलेक्ट्रिक बस अमरावती पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून काढत मोठे यश मिळवले आहे. या प्रकर...
Continue reading
वारंगल : शेतात किंवा घराच्या अंगणात सोन्याचा खजिना सापडल्याच्या कथा आपण अनेकदा ऐकतो. मात्र अशाच एका घटनेने तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. गवत कापण्यासाठी गे...
Continue reading
'तुझ्या पोटात दुसऱ्याचं बाळ, DNA टेस्ट कर'... संशय, मानसिक छळ आणि अखेर 5 महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या; पती-सासू अटकेत
5 महिन्यांच्या गरोदर सुष्मिताची आत्महत्या : तेलंगणाती...
Continue reading
Farmhouse Crime Mystery 2026: 20 सहकारी, मध्यरात्री संशयास्पद मृत्यू; स्विमिंग पूलमधील गूढाने हादरले तेलंगणा
तेलंगणातील चौतुप्पल परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका फार्महाऊस पार्...
Continue reading
विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाने जिंकली सर्वांची मनं; 180 होतकरू विद्यार्थ्यांना दिली स्कॉलरशिप, शिक्षणासाठी उचललं प्रेरणादायी पाऊल
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोक...
Continue reading
छत्तीसगड, Bijapur एनकाउंटर: माओवाद्यांना मोठा धक्का, पोलिस कारवाईत 12 ठार
Bijapur , छत्तीसगडच्या दक्षिण भागात स्थित आहे, जो अनेक वर्षांपासून नक्षलवादी हालचालीसाठी हॉटस्पॉट राहिला ...
Continue reading
Horrific Accident in Telangana : वाळूने भरलेल्या ट्रकशी एसटी बसची धडक, 20 जणांचा मृत्यूतेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात आज सकाळी भीषण Accident झाला असून, एसटी बस आणि...
Continue reading
तेलंगणामध्ये आरक्षण आंदोलन: 42% आरक्षणासाठी पेटले आंदोलन
तेलंगणामध्ये आरक्षणासाठी आंदोलन जोरात सुरू आहे. मागास वर्गासाठी 42 टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंद पुकारण्यात आला ...
Continue reading
त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री
के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत बीआरएसच्या या सहा आमदारांनी
पक्षप्रवेश केला आहे.
गेल्या वर्षी तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती.
या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर के. चंद्रशेखर राव यांना धक्यावर धक्के बसत आहेत.
आता बीआरएसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये दंडे विठ्ठल,
भानू प्रसाद राव, एमएस प्रभाकर, बसवाराजू सरैया, बोग्गारापू दयानाद
आणि येगे मल्लेशम यांचा समावेश आहे.
या आमदारांच्या काँग्रेसमधील पक्ष प्रवेशावेळी काँग्रेसच्या प्रभारी
दीपा दास मुंशी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, तेलंगणा विधानपरिषदेत बीआरएसचे २५ सदस्य आहेत.
मात्र, बीआरएसच्या विधानपरिषदेतील ६ आमदारांनी
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची ताकद आणखी वाढली आहे.
विधानपरिषदेतील काँग्रेसच्या आमदारांची संख्या चारवरून आता दहावर पोहचली आहे.
माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे विश्वासू समजले जाणारे
केशव राव यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
केशव राव हे राज्यसभेवर खासदार होते.
मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर केशव राव यांनी खासदारकीचा
राजीनामा दिला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते.
दिल्ली दौऱ्यावरून तेलंगणात दाखल झाल्यानंतर गुरुवारी रात्री
बीआरएसच्या सहा आमदारांनी मध्यरात्रीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
के. चंद्रशेखर राव हे दोन पंचवार्षिक सत्तेत राहिले.
मात्र, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बीआरएसचा दारुण पराभव झाला.
बीआरएसला ११९ पैकी फक्त ३९ जागा मिळाल्या होत्या.
त्यामधूनही निवडणुकीनंतर काही आमदारांनी बीआरएससोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता.
यानंतर आता विधानपरिषदेतील सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे
बीआरएस पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/labor-party-in-britain-sattever-after-14-years/