अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अतिदुर्गम भागातील जि. प. वरि. प्राथमिक मराठी शाळा, वस्तापूर येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीने झाली. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक संजय साळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. प्रास्ताविकातून त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व, संविधानातील मूल्ये आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, कविता व कवायत संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी अ-साक्षर मुक्त गाव व तंबाखू मुक्त गावाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश बेलसरे, सरपंचा सुनीता कासदे, संजय कासदे, संजय गयधर, पार्वती जामूनकर, मनोहरसिंग गयधर, धोटे साहेब, सौ. सुरेखा ढिगर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Related News
CJI Suryakant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांना विद्यार्थ्यांचा विरोध; पदवी घेण्यास नकार, विद्यापीठाला थेट पत्र
अकोल्यात मामा-भाचीने रेल्वेखाली उडी घेतली; 2 जणांचे प्राण थोडक्यात बचावले
युरिया खरेदीसाठी आता सातबारा अनिवार्य; अकोटमध्ये रांगा ओसरल्या
धक्कादायक! एआय व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेचा छळ; मूर्तिजापूरातील 25 वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा
पातुर येथे राज्याचे निवडणूक आयुक्त व सचिवांनी नगरपरिषद निवडणुकीचा घेतला आढावा
वादळी वाऱ्याचा भीषण तडाखा: 5 गावांतील शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान, घरांवरील टीन उडाले; अनुदानाची तीव्र मागणी
ऑपरेशन प्रहारचा दणका! बार्शीटाकळी हादरली! गावठी दारू विक्रेते आणि जुगार अड्डे पोलिसांच्या रडारवर ,6 ठिकाणी छापे
अकोट : चंडिकापूरमध्ये नाली व पेव्हर ब्लॉक कामात गैरव्यवहाराचा आरोप; चौकशीची मागणी
नदी घाटावरील गुप्त कारवाईची गरज – टाकळी बु.अवैध रेती राज
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण रेखाते यांनी तर आभार प्रदर्शन मनोज दुधे यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
