अकोला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असताना विविध महसुली प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता केल्याच्या आरोपावरून तत्कालीन उपअधीक्षक तथा सध्या निलंबित असलेले पंकज पवार यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज पवार हे जून २०२३ ते जून २०२५ या कालावधीत उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून विविध महसुली प्रकरणांमध्ये नियमबाह्य निर्णय घेतल्याचा आरोप आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान अनेक गंभीर बाबी उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे. जमीन मालकी हक्काशी संबंधित सातबारा नोंदींमध्ये फेरफार करणे, मृत व्यक्तींच्या नावाने अर्ज स्वीकारणे, भाडे तत्त्वावरील मालमत्तांची पत्रके तयार करणे, सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेली जमीन खासगी व्यक्तींच्या नावावर दाखविणे तसेच अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन विविध प्रमाणपत्रे देणे यांसारख्या अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे.
Related News
पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार? मुंढवा जमीन प्रकरणात थेट आरोपी करण्याची मागणी
शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान आयोगाच्या भूमिकेवर मोठा प्रश्न
शिंदेंच्या वकिलाचे दोन मोठे युक्तिवाद; शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात कोर्टात काय घडलं?
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; अहमदाबादचा प्रवास रस्तेमार्गे
दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’
Manoj Jarange Patilनी 20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण वाद थांबेना; अजय महाराज बारस्करांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला फडणवीसांचं प्रत्युत्तर; ‘आम्ही करून दाखवलं, पुढेही करून दाखवू’
UPI पेमेंटवर आता शुल्क? 15 ऑक्टोबरपासून काय बदलणार, ग्राहकांवर किती परिणाम होणार?
UPI वर पैसे पाठवताना आता शुल्क लागणार? 2,000 रुपयांच्या व्यवहाराबाबत सरकारचा नियम काय?
Cigarette Price Hike: सिगारेटच्या दरात मोठी वाढ; कोणता ब्रँड किती रुपयांना मिळणार?
लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे आक्रमक; 5 हजार कोटींच्या रकमेवर सरकारला थेट सवाल
या प्रकरणात शासनाचा विश्वासघात, महसुली नोंदींमध्ये फेरफार आणि शासकीय कामकाजातील नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका पवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे सिटी कोतवाली पोलिसांनी प्राथमिक चौकशी पूर्ण करून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून गैरव्यवहाराच्या व्याप्तीचा शोध घेतला जात आहे. भूमी अभिलेख विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाकडे महसूल विभागासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे. पोलिस तपासातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
