अकोला जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठी कारवाई करत बोरगाव मंजू पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला अखेर अटक केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गाजलेल्या या प्रकरणात पोलिसांनी जलद हालचाल करत “मारून टाकीन” अशी धमकी देणाऱ्या गुंडाला गजाआड केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू परिसरातील पूर्णा नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक सुरू असताना एका पोलिस कर्मचाऱ्याने ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संबंधित चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भरधाव ट्रॅक्टर पुढे नेला. याचवेळी त्याने पोलिसांना शिवीगाळ करत “मारून टाकीन” अशी उघड धमकी दिली होती. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
व्हिडिओ व्हायरल होताच जिल्हाभरातून संताप व्यक्त करण्यात आला. पोलिस दलाच्या सन्मानावर घाला घालणाऱ्या या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर बोरगाव मंजू पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला.
Related News
पातुर येथे राज्याचे निवडणूक आयुक्त व सचिवांनी नगरपरिषद निवडणुकीचा घेतला आढावा
वादळी वाऱ्याचा भीषण तडाखा: 5 गावांतील शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान, घरांवरील टीन उडाले; अनुदानाची तीव्र मागणी
ऑपरेशन प्रहारचा दणका! बार्शीटाकळी हादरली! गावठी दारू विक्रेते आणि जुगार अड्डे पोलिसांच्या रडारवर ,6 ठिकाणी छापे
अकोल्यात आयजीपीं महेश पाटीलची धडाकेबाज एंट्री ; गुन्हेगारी नियंत्रणासाठी 10 महत्त्वपूर्ण निर्देश !
-
By
Vivek Raut
पुणे NEET Paper Leak मध्ये धक्कादायक खुलासा! ‘GOD’ तेजस शहाचं मोठं कनेक्शन समोर, CBI च्या तपासात खळबळ
आगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ! १३ दिवस उलटले तरी ट्रॅक्टरचा शोध नाही, शेतकरी संतप्त
“अकोट बसस्थानक मंगळसूत्र चोरी प्रकरण: 1 तासात धडाकेबाज अटक, पोलिसांची मोठी यशस्वी कारवाई”
“अकोला रामदासपेठ खून प्रकरणाचा धक्कादायक उलगडा: प्रेमविवाहातून उद्भवलेल्या वादातून ४ आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!”
खळबळजनक धडक कारवाई: रायपूर पोलिसांची ३ आरोपींवर मोठी कारवाई, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोल्यात घरगुती वादातून पत्नीची हत्या; पतीने धारदार शस्त्राने केले वार
प्रादेशिक वन विभागाच्या जंगलातील दुहेरी मृत्यूचे गूढ अखेर उलगडले.
सखोल तपास आणि शोधमोहीम राबवत पोलिसांनी अखेर आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धमकी देणे, तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना मोठा धक्का बसला असून “कायद्यापुढे कोणीही मोठे नाही” हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत अशाच कठोर पावलांची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने अवैध वाळू उत्खननाविरोधात आणखी कडक मोहीम हाती घेण्याचे संकेत दिले असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
या कारवाईमुळे काही काळ तरी वाळू माफियांचा बंदोबस्त होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.