पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आषाढी एकादशीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

महाराष्ट्रामध्ये

महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीचा सण साजारा केला जात आहे.

वारकरी मंडळी, विठ्ठल-रूक्मिणी मातेचे भक्त आज

मंदिरामध्ये दर्शन घेऊन दिवसभराचा उपवास करून एकादशीचे व्रत पाळत आहेत.

Related News

अशामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील X  वर पोस्ट करत

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी त्यांनी मराठी मध्ये पोस्ट केली आहे.

‘आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची

उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे’अशी भावना त्यांनी पोस्ट मध्ये मांडली आहे.

त्यांची एक्स हँडल वरील पोस्ट पुढील प्रमाणे आहे-

“आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद

नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद

आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे.

या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे.

अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे.”

Read also: https://ajinkyabharat.com/big-blow-to-ajit-pawar/

Related News