माजी आमदारासह 15 नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात करणार प्रवेश
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभेनंतर
विधानसभा निवडणुकीत देखील मोठा झटका बसत आहे.
Related News
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
12 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा समृद्धी महामार्ग रोखणार; रोहित पवारांचा सरकारला इशारा
रोहित पवार : राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ जाहीर केला असला,...
Continue reading
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करण्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून देश...
Continue reading
पुण्यात ‘बापट’ इफेक्ट? 150 गणेश मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीची परवानगी नाकारली; रवींद्र धंगेकर आक्रमक
गणेश विसर्जनाला अवघे काही दिवस शिल्लक; पोलिसांच्या निर्णयावर गणेश मं...
Continue reading
अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावूक; भरसभेत डोळ्यात अश्रू, म्हणाल्या- ‘३२ वर्षे ५ महिन्यांचं अतूट नातं’
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०९व्या वार्षिक सर्वसाधा...
Continue reading
135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; मुंबई-छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अं...
Continue reading
INDIA आघाडीत मोठी फूट? ममता बॅनर्जींची वेगळी राजकीय चूल; कनिमोळींच्या भेटीनंतर तिसऱ्या आघाडीची चर्चा
देशाच्या राजकारणात 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाड्यांच्या र...
Continue reading
राष्ट्रवादीचं मेगा प्लॅनिंग; सुनेत्रा पवारांचं रिलाँचिंग, 'आपल्या वहिनी आहेत ना!' कॅम्पेनची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी नव्या रणनीतीची आखणी सु...
Continue reading
शरद पवार मैदानात! ऐन गणेशोत्सवात राष्ट्रवादीची तातडीची बैठक; दुष्काळ, जरांगे आंदोलनावर होणार चर्चा
राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक...
Continue reading
मोठी बातमी! 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात उलटली; 4 ते 5 विद्यार्थी जखमी
बारामती : बारामती तालुक्यातील सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अ...
Continue reading
कारण पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले,
विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर
यांनी राजीनामे दिले आहेत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह
15 पेक्षा अधिक नगरसेवक आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात
पक्ष प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या
मोदी बाग या निवासस्थानी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड हा बालेकिल्ला समजला जातो.
परंतु चिंचवड आणि भोसरीमध्ये सध्या भाजपचा आमदार आहे.
मात्र, ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असे महायुतीचे सूत्र ठरले आहे.
त्यामुळे भाजप उमेदवाराला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार विलास लांडे,
स्थायी समितीचे मा.अध्यक्ष अजित गव्हाणे यांसह
भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख नगरसेवक आणि पदाधिकारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
तरी यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.