– ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये (चर्च) यावेळी
Related News
उंबर्डा बाजार : (वार्ताहर)
गेल्या दोन दिवसापासून मान्सून पावसाची जोरदार हजेरी लागत आहे.
त्यातच सायंकाळी पडलेल्या दमदार पावसामुळे उंबर्डा बाजार वासीयांची चांगलीच तारांबळ उडाली...
Continue reading
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बिरसा क्रांती दल यांच्यावतीने एक दिवसीय धरणे
आंदोलन करण्यात आले यावेळी आदिवासींचे शिक्षण व नोकरी या क्षेत्रामध्ये गैर आदिवासींनी खोटे
सर्ट...
Continue reading
मे महिना संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असतानाही मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावातील नाल्यांचे उपसण अद्याप झालेले नाही.
परिणामी ठिकठिकाणी नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावरून वाह...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील दाळंबी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या
दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. दाळंबी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर...
Continue reading
प्रतिनिधी | अकोला
अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियमजवळ आज (शनिवारी) पहाटे चारच्या सुमारास
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका इसमाच्या ई-बाईकला अचानक आग लागल्याची घटना घडली.
प्रसंगावध...
Continue reading
एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारी परिसरात १५ जुन रोजी राजकुमार चौहान
नावाच्या तरुणाने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पैगंबर मोहम्मद आणि कुराण-ए-पाक
यांच्यावर ...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी येथील घरकुल योजनेच्या बांधकामाची व भ्रष्टाचाराची पथका मार्फत चौकशी करण्यात यावी.
या बाबत दिनांक ११/४/२०२५ रोजी गटवि...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा
धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.फळबाग संत्रा मृग बहार आणि...
Continue reading
राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या ताब्यातील रुग्णवाहिकेचा अपघात तीन दिवसांपूर्वी झाला होता.
यादरम्यान मृद व जलसंधार...
Continue reading
कुंभारी एक छोटसं गाव फार तर तिथे जायला अकोल्यावरूनदहा मिनिट लागतील.
एक जुलै 1977 रोजी एका तुकाराम बिडकर नावाच्या ध्येय वेड्या व्यक्तीने जय बजरंग व्यायाम शाळेची स्थापना केली.
...
Continue reading
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बैठक मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठ...
Continue reading
अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यासाठी प्रहार जनशक्ती
पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन ...
Continue reading
प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त उद्या,
रविवारी ख्रिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहेत.
प्रभू येशू ख्रिस्तांनी अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी क्रूसखांबावर दिलेल्या
बलिदानाची आठवण म्हणून जगभरात गुडफ्रायडे (उत्तम शुक्रवार) हा सण साजरा केला जातो.
अकोल्यातही शुक्रवारी हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी शहर आणि
जिल्ह्यातील सुमारे 30 चर्चेसमधून प्रार्थनासभांचे सकाळी आणि दुपारी आयोजन करण्यात आले.
खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळात आयोजित प्रार्थनासभेमध्ये,
प्रभू येशू खिस्तांनी क्रूसखांबावर लटकविण्यात आले असता उच्चारलेल्या सात
वाक्यांवर रश्मी परमार, सिनाय कदम, फिलमोन ठाकूर, अमित ठाकूर, मीना बिरपॉल, सारा ढिलपे,
रेव्हरंड निलेश अघमकर यांनी बायबलमधील विविध वचनांचा आधार घेत प्रकाश टाकला.
यामध्ये यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी अमित ठाकूर, राजेश ठाकूर, यशवंत ठाकूर,
शीतल ठाकूर, फिलमोन ठाकूर, वैशाली डोंगरदिवे, वंदना गजभिये यांनी गुडफ्रायडेवर आधारित गीते सादर केली.
संचालन वैशाली डोंगरदिवे यांनी केले.
गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र लेन्थ महिना सुरु होता.
या चाळीस दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात.
घरोघरी कॉटेज प्रेअर्सचे आयोजन केले जाते. गुरुवारी मौंदी गुरुवारनिमित्त प्रार्थनासभा होते.
गुडफ्रायडेच्या दिवशी या उपवासांची सांगता होते.
दरम्यान, उद्या अर्थात रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त जगभरात ईस्टर संडे हा सण साजरा करण्यात येणार आहे.
त्यासाठी बेथेल सेव्हिअर्स चर्चच्या प्रांगणात शनिवारी रात्रीच एक मोठे रिंगण तयार करण्यात येते.
रविवारी पहाटे सहा वाजता अकोल्यातील सर्वच चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी होतात.
त्यानंतर चर्चमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mokha-grampanchayaticha-bezbabdar-karbara/