पातूर प्रतिनिधी — पातुर तालुक्यातील सस्ती येथील महावितरण सबस्टेशनचा कारभार ढेपाळला असून शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांमध्ये जोर धरत आहे. पांगरताटी येथील शेतकरी किशोर शिवराम जाधव, गौतम रामलाल दुग्गड आणि प्रकाश नामदेव चोंडकर यांच्या शेतातील बंद पडलेल्या डीपीबाबत वारंवार निवेदन देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 06 जून 2025 पासून सस्ती सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांगरताटी शिवारात शेतकरी जाधव, दुग्गड आणि चोंडकर यांच्या तीनही डिप्या पावसाळ्यातील पाण्यात वाहून गेल्या होत्या. तेव्हापासून त्या दुरुस्त न झाल्याने शेतजमिनींना सिंचन मिळत नाही. गहू, हरभरा यांसारख्या हंगामी पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे पिक पाण्याअभावी सुकण्याच्या स्थितीत आहे.
शेतकरी बांधवांनी अनेकवेळा सस्ती येथील महावितरण कार्यालयात अर्ज, निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहाय्यक अभियंता आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
Related News
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मोठा दिलासा; CJP कार्यकर्त्यांवरील कारवाई झाल्यास मोफत कायदेशीर लढ्याची घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या माग...
Continue reading
12 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा समृद्धी महामार्ग रोखणार; रोहित पवारांचा सरकारला इशारा
रोहित पवार : राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ जाहीर केला असला,...
Continue reading
Rohit Pawar चा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का?’
दुष्काळी पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून Rohit Pawarची टीका; शेतकऱ्यांना ...
Continue reading
Abhijeet Dipke: ‘आता तुझी पाळी आहे, तयारीत राहा’; अभिजीत दिपके यांनी कोणाला दिली वॉर्निंग?
Abhijeet Dipke CJP: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके गेल्या काही महिन्या...
Continue reading
भोरमधील सबस्टेशन प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा – सुप्रिया सुळे
भर पावसात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा
पुणे ज...
Continue reading
अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन देणारे 7 शाकाहारी पदार्थ; नाश्त्यात आवर्जून करा समावेश
नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. सकाळच्या नाश्त्यामध्ये शरीराला पुरेसे प्रोट...
Continue reading
कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदला; रामदास आठवलेंचा अभिजीत दीपके यांना सल्ला, म्हणाले- ‘तरुण झुरळ नसतात!’
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच क...
Continue reading
नाशिक-पुणे रेल्वेसाठी समृद्धी मार्ग रोखला; आंदोलन आणखी पेटलं, ताब्यात घेतल्यानंतर सत्यजित तांबेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून अ...
Continue reading
पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी! पाकव्याप्त काश्मीरमधील 7 जागांची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) नागरिकांचा वाढता असंतोष, आंदोलनं आणि...
Continue reading
अभिजीत दिपके यांच्याकडून मोठे संकेत! ‘राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण...’; CJP च्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP ची दोन दिवसीय महत्त्वाची बैठक; ...
Continue reading
पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अल्पवयीन मुलीला धमक्या; तीन वेळा घर बदलावे लागल्याचा दावा
जंतर-मंतर आंदोलनातील व्हिडीओनंतर प्रकरणाला नवे वळण
नी...
Continue reading
सरकारचे टेन्शन वाढले? अभिजीत दिपके यांच्या घरी CJP ची महत्त्वाची बैठक; 15 ते 20 प्रमुख सदस्यांची उपस्थिती, पुढील रणनीतीवर चर्चा
छत्रपती संभाजीनगरमध्ये कोअर कमिटीची...
Continue reading
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. “आम्ही शेतकरी आहोत… आमच्या शेतातली पिकं पाण्याअभावी सुकत आहेत. सावकाराकडील कर्ज फेडण्यासाठी आमच्याकडे काहीच मार्ग नाही. आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. शासनानेच आम्हाला गळफास घेण्याची परवानगी द्यावी किंवा आम्ही का गळफास घेतो हे नाटकाच्या माध्यमातून सस्ती सबस्टेशनसमोर आंदोलन करून दाखवू,” असा थेट इशारा कापकर यांनी दिला.
सस्ती सबस्टेशनच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आगामी काळात या आंदोलनाचे रूप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shirla-village-panchayats-chief-nalyachi-malfunction/