उरळ पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक गुरुवारी उरळ येथे आले. पोलीस तपास, चालू प्रकरणांचा आढावा आणि स्टेशनच्या कामकाजाचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी पोलिसांना जनतेशी अधिक समन्वय ठेवत विश्वास वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा पोलिस अधीक्षक चांडक म्हणाले, “पोलिसांवर जनतेचा विश्वास आहे. हा विश्वास वाढविण्याची जबाबदारी आपली आहे. सकारात्मक दृष्टीकोन, समन्वय आणि तात्काळ कृतीमुळे गुन्हे रोखता येतात. गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून त्यांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत.”
तपास कौतुकास पात्र
निरीक्षणावेळी उरळ ठाणेदार पंकज कांबळे यांनी विविध तपास प्रकरणांची माहिती सादर केली. गावठी दारू अड्डे उध्वस्त करणे, अमली पदार्थांवर केलेली कारवाई, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या अर्ध्या तासात अटक, तसेच इतर गंभीर प्रकरणांवरील तात्काळ प्रतिसाद या कार्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.
Related News
EPFO चा डबल धमाका! वेतन मर्यादा 25 हजारांवर; EDLI विमा 10.5 लाख होणार?
EPFO EDLI Insurance Scheme : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन...
Continue reading
EPFO ची मोठी बातमी! PF वेतनमर्यादा 15 हजारांवरून 25 हजार; 51 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार सामाजिक सुरक्षेचे कवच
देशातील पगारदार कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला ...
Continue reading
EPFO Salary Limit Update : EPFO च्या 10 वर्षांपूर्वीच्या नियमात मोठा बदल? 25 हजार रुपयांपर्यंतच्या मूळ वेतनावर मिळणार पेन्शनचा लाभ; अर्थ मंत्रालयाची मंजुरी?
EP...
Continue reading
1150 कोटींचं कोकेन जप्त : भारतामध्ये अमली पदार्थांविरोधातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक कारवाई गुजरातमध्ये पार पडली असून, या ऑपरेशननं संपूर्ण देश हादरला आहे. तब्बल 196 दिवसांचा स...
Continue reading
Twisha Sharma च्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! 20 लाखांचे शेअर्स, CCTV लॉग्स आणि शेवटच्या 40 मिनिटांचा तपास; CBIच्या रडारवर संपूर्ण कुटुंब
अभिनेत्री आणि मॉडेल Twisha Sharma हिच्...
Continue reading
68 वर्षांनंतर उलगडलं अमेरिकेतील ‘मार्टिन फॅमिली’चं गूढ रहस्य; नदीच्या तळाशी सापडली कार, तपासातून समोर आलं धक्कादायक सत्य
अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात 1958 मध्ये घडलेलं एक रहस्यमय प्र...
Continue reading
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं असून, टिटवाळा परिसरात उघड झालेल्या एका हायप्रोफाईल ड्रग्ज रॅकेटने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. एका महिलेच्या अलिशान घरा...
Continue reading
ठाणे: पोलीसांचे संरक्षण करताना काही वेळा स्वतः पोलीसच संकटात सापडतात, अशी धक्कादायक घटना ठाणे कारागृहात समोर आली आहे. अविनाश अशोक जाधव या कैद्याने कारागृहात असताना पोलीस कर्मचाऱ्या...
Continue reading
Akola News: अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील रेणुका दिनेश केकन हिने देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून ऐतिहासिक यश मिळवले आहे. पातूर ताल...
Continue reading
पाणीपुरवठा, रस्ते आणि विकासाच्या कामांवर बोलणाऱ्या आलेगाव ग्रामपंचायतीत सध्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका निलंबित ग्रामसेवकाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून जनसुविध...
Continue reading
A Big Gift from the Government for Pensioners ! Atal Pension योजना 2030-31 पर्यंत वाढवली; जाणून घ्या सविस्तर माहिती
Pension : केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी सामा...
Continue reading
उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हाता गावात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोड्यांची मालिका राबवून गावात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दि. १६ जानेवारी रोजी रात्री १ ते १.३० ...
Continue reading
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ठाणेदार पंकज कांबळे, पीएसआय गणेश कायंदे, पीएसआय मुंढे तसेच तपासात सहकार्य करणारे अंमलदार व हवालदार यांचा सत्कार करण्यात आला.
निर्माणाधीन पोलीस स्टेशन इमारतीची पाहणी
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उरळ पोलीस स्टेशनच्या निर्माणाधीन इमारतीची पाहणी करून बांधकामाची माहिती घेतली. यावेळी बाळापुरचे उपविभागीय अधिकारी गजानन पडघन उपस्थित होते.
रांगोळीने सजले पोलीस स्टेशनचे प्रांगण
उरळ पोलीस स्टेशनच्या प्रांगणात जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हुबेहूब प्रतिमेची रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळी पाहून चांडक यांनी तीचे छायाचित्र काढले. तसेच त्यांचे नाव आणि छायाचित्र असलेली आकर्षक फ्रेम देऊन ठाणेदार पंकज कांबळे यांनी त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमास पोलीस पाटील, शांतता समिती, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच उरळ पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
read also : https://ajinkyabharat.com/poor-management-of-affordable-mahadistribution-substation-farmers-protest/