पातूर येथे सुमधुर गीतांनी रंगली पाडवा पहाट; किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांनी सादर केली मराठमोळी संस्कृती

https://ajinkyabharat.com/patur-yehehe-sumadhur-gitanani-rangali-padwa-pahat-kids-paradaijchaya-vidyarthani-sadar-keli-marathmoli-sanskriti/

पातूर – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि पातूरच्या आराध्य दैवत संत श्री सिदाजी महाराज साप्ताह

सोहळ्याच्या निमित्ताने “पाडवा पहाट” या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण तयार केले.

संत श्री सिदाजी महाराज संस्थान, स्वर साधना संगीत विद्यालय आणि

Related News

किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. विलास राऊत यांनी सादर केलेल्या भूपाळीने झाली.

यानंतर नंदाताई नीलखन, स्वरा राखोंडे, चैताली वडतकर, श्रेया नीलखन, गौरव वडकुटे,

सौ. रूपाली भिंगे, औदार्य डोंगरे, काजल श्रीनाथ, अबीर ढोणे,

सौ. अंकिता उगले, प्रा. कीर्ती डोंगरे, आकाश गाडगे, भक्ती निंबोकार,

संदीप देऊळगावकर, रमेश काळपांडे आदी कलाकारांनी सुमधुर भक्तिगीते आणि

भावगीते सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

संगीत संयोजन प्रा. विलास राऊत, तबला प्रवीण राऊत, तसेच अंश अत्तरकार, गौरव वडकुटे,

आकाश गाडगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन गोपाल गाडगे आणि संदीप देऊळगावकर यांनी केले,

तर साउंड व्यवस्थापनाची जबाबदारी संतोष लसनकर यांनी सांभाळली.

विद्यार्थ्यांनी उलगडली मराठमोळी संस्कृती

किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्यातून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवले.

आनंदी पाटील, स्वानंदी राठोड, आराध्या बंड, तनवी सानप, नारायणी देवकर, अन्वी गोमाशे,

वीरा बारताशे, आरोही सौंदळे, वेदिका निंबोळे, निधी फुलारी, शर्वरी गाडगे,

प्राची तायडे, प्रतीक्षा जाधव, आराध्या निंबोकार, वैदही सौंदळे, लावण्या गाडगे, स्पंदन गाडगे,

ईश्वरी राऊत, विदिशा तेलगोटे, सृष्टी जाधव, गौरी गिऱ्हे, श्रेया राठोड, मनस्वी शिंदे

आदी विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

या नृत्य सत्राचे निवेदन श्रावणी गिऱ्हे हिने केले. नृत्यदिग्दर्शन नयना पाटोने, तर सहकार्य

नयना हाडके आणि नीतू ढोणे यांनी केले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन

किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

या सांस्कृतिक सोहळ्यास ज्येष्ठ नागरिक संघाचे पातूर तालुका अध्यक्ष नारायणराव अंधारे,

स्वर साधना संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. विलास राऊत, किड्स पॅराडाईज पब्लिक

स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, सिदाजी महाराज संस्थानचे संचालक प्रवीण इंगळे,

प्रा. सुभाष इंगळे, प्रा. डोंगरे, अनंता अंधारे, काशीराम गाडगे, विलास वडकुटे, जगदीश निंबोकार आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण पातूर तालुक्यात “पाडवा पहाट” या सांस्कृतिक कार्यक्रमाने नववर्षाच्या

स्वागताला भक्तिमय आणि उत्साही रंगत आणली.

Related News