नवी दिल्ली | 8 मे 2025 — जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर
भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथील 9 दहशतवादी ठिकाणांवर
6-7 मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार हल्ले करून दहशतवाद्यांच्या गडांना लक्ष्य केले.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
भारताच्या या अचूक आणि संयमित कारवाईला अमेरिका, फ्रान्स, इस्रायल आणि अनेक युरोपीय देशांनी पाठिंबा दर्शवला असून,
ही कारवाई दहशतवादविरोधी योग्य पावलं असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, तुर्किए, अज़रबैजान आणि कतार
या तीन प्रमुख मुस्लिम देशांनी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेत भारताच्या कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे.
तुर्किएची तीव्र प्रतिक्रिया
तुर्किएच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत म्हटलं की,
“भारताच्या या कारवाईमुळे युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. आम्ही भडकावू पावलं आणि नागरिक ठिकाणांवर हल्ले यांचं समर्थन करत नाही.
” त्यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि कूटनीतिक मार्गाने तोडगा शोधण्याचे आवाहन केले. भारताने मात्र स्पष्ट केलं आहे की,
कारवाई केवळ दहशतवादी तळांवरच झाली असून कोणत्याही नागरी किंवा सैन्य प्रतिष्ठानावर हल्ला करण्यात आलेला नाही.
अज़रबैजान आणि कतारचा संयमी विरोध
अज़रबैजाननेही भारताच्या कारवाईला आक्रमक ठरवत निंदा केली आहे.
त्यांनी पाकिस्तानातील नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केलं.
याउलट कतारने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं असून,
शेजारी देश म्हणून शांततापूर्ण तोडगा शोधण्यावर भर दिला आहे.
पाकिस्तानचा आक्षेप आणि भारताची स्पष्टता
पाकिस्तानने ही कारवाई “युद्धाची घोषणा” असल्याचं सांगत तीव्र निषेध केला आहे.
त्यांनी यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघ आणि OICमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भारताने मात्र पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, या कारवाईत फक्त जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि
हिजबुल मुजाहिदीन यांच्या गडांना लक्ष्य केलं असून कोणतीही नागरी हानी भारताच्या कारवाईत झालेली नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-ankhi-a-motha-decision/